नाशिक : ATM फोडणारी परप्रांतीय टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police arrest

नाशिक : ATM फोडणारी परप्रांतीय टोळी जेरबंद

सातपूर (नाशिक) : सातपूर अशोकनगर परिसरात युनियन बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी चार परप्रांतीय संशयितांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिली.

शनिवारी (ता. २५) पहाटे पाच वाजेच्या सुमारास अशोकनगर येथील युनियन बँक व महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर काही संशयित आले व त्यांनी एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. फोडण्याचा प्रयत्न करताच सायरन मुंबई ऑफिसमध्ये वाजला. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, हवालदार संजय शिंदे, पोलिस नाईक शरद झोले, अंमलदार अनंता महाले, शिपाई संभाजी जाधव आदींसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाचे सूत्र फिरवत चार परप्रांतीय संशयितांना ताब्यात घेतले. अजून काही संशयितांचा यात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा: Nashik : अज्ञातांनी फोडल्या 3 चारचाकी वाहनांच्या काचा

हेही वाचा: मालेगाव कॅम्प कॉलेज रोडरील सराफी दुकानात दरोडा

Web Title: Atm Burglary Gang Arrested In Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikthief