Nashik Leopard Attack News: चिराईत दबा धरून बसलेल्या बिबट्याकडून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

leopard
leopardesakal

Nashik News : काटवन परिसरातील शेतकरी विश्वास गोविंद अहिरे हे शेतात फेरफटका मारत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून, आहिरे यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (attack on farmer by leopard hiding at chirai Nashik News)

चिराई (ता.बागलाण) येथील शेतकरी विश्वास गोविंद अहिरे मंगळवार (ता.१५) रोजी गावात स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम अटोपल्यानंतर त्यांच्या महड शिवारातील गट क्रमांक ४४ येथील शेतीशिवारातील पिकांची पाहणी करण्यासाठी फेरफटका मारत असतानाच अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून श्री. अहिरे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला.

बिबट्याबरोबर जोरदार प्रतिकार करत आरडाओरड करून शेतातील घराकडे धाव घेत असतानांच पुन्हा बिबट्याने पाठीमागून हल्ला चढविला.

या भयानक परिस्थितीतही मोठ्या हिमतीने घराजवळ येताच घरातील कुटुंबियांनी समोरचे भयावह दृश्य बघताच मोठ्याने आरडाओरड केली यामुळे बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली व बिबट्याने धुम ठोकली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

leopard
Leopard Attack News: मुलगी जंगलात पालकांसोबत चालत असताना अचानक गायब झाली, अखेर...

कुटुंबीयांनी तातडीने गंभीर जखमी झालेल्या विश्वास अहिरे यांना नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने वैद्यकीय आधिकारी डाॅ. संकेत पाडोळे यांनी प्राथमिक उपचार करून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. श्री. अहिरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय आधिका-यांनी सांगितले.

 अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्तसंचार 

 काटवन व मोसम परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा अधिवास वाढला आहे. अनेकदा पाळीव जनावरांवर व नागरिकांवर बिबट्यांकडून हल्ल्याच्या घटना घडत असल्याने पिंजरे लावून बिबट्यांना वनविभागाकडून रेस्क्यू केले जाणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

leopard
Nashik Leopard News : दोन बिबट्यांचा दुचाकीस्वारावर हल्ला; तिघे गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com