Nashik : गणेशाच्या विविध रूपांनी सजली बाजारपेठ

Ganesha idol
Ganesha idolesakal

जुने नाशिक : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. द्वारका पौर्णिमा बसस्थानक परिसरासह शहराच्या विविध भागात गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल सजले आहे. या स्टॉलवर विक्रीसाठी आलेले गणरायाचे विविध रूपे भाविकांना आकर्षित करत आहे. (Market decorated with various forms idols of Ganesha Nashik Latest Marathi News)

गणेशोत्सवास बुधवारी (ता. ३१) सुरवात होणार आहे. त्यानिमित्त बाजारपेठांसह भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम मूर्तीकारांकडून सुरू आहे. तर, काही ठिकाणी प्रत्यक्ष मूर्ती विक्रीचे स्टॉल लागले आहे.

परिस्थिती सामान्य असल्याने यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे विक्रेते आणि नागरिकांकडून गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे.

भाविकांची मागणी लक्षात घेता कारागिरांकडून यंदाची नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती साकारण्यावर भर दिला आहे. दगडूशेठ हलवाई आणि लालबागचा राजा गणेशमूर्ती अधिक मागणी असली तरी चिमुकल्या भाविकांमध्ये आकर्षण ठरणाऱ्या गणेशमूर्तीदेखील बाजारात विक्रीस आले आहे.

फेटाधारी, पगडीधारी, मयुरेश्वर, वारकरी, लंबोदर, घंटीवरील विराजमान, रिद्धी सिद्धी, अलंकार जडित, हत्तीकर्ण, चंद्रावर विराजमान, बालगणेश, श्रीकृष्ण रुपी, महंत रूप यासह अन्य कितीतरी रुपी बाजारात विक्रीस आलेल्या बाप्पांची मूर्ती भाविकांना आकर्षित करत आहे. बहुतांशी नागरिकांकडून अशा या वैशिष्ट्यपूर्ण मुर्त्यांची बुकिंगदेखील करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Ganesha idol
पौरोहित्‍यातही महिलाराज | आवड जोपासताना सत्त्वाची ओळख

दर वाढण्याची शक्यता

यंदाची विशेषतः म्हणजे पीओपी मूर्ती विक्रेते आणि कारागिरांना महापालिकेकडून पीओपी मूर्तीस बंदी असल्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेकांचा कल शाडू मातीच्या मूर्तींकडे वळल्याने यंदा पीओपीच्या मूर्तीच्या प्रमाणात शाडू मातीच्या मुर्त्यादेखील बाजारात विक्रीस आल्या आहे.

बंदी असल्याचे नोटिशीमुळे आणि कारागिरांनी पीओपीच्या मूर्ती साकारण्याचे प्रमाण कमी ठेवले होते. परंतु त्यांनाही विक्रीस परवानगी असल्याची माहिती विक्रेत्यांना मिळताच आणि भाविकांची मागणी लक्षात घेता सध्या तयार केलेल्या मूर्तीचे दर काही अंशी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

Ganesha idol
राज्य नाट्य स्पर्धा प्रवेशिकेसाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com