Nashik Crime News : महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून जाळपोळीचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून जाळपोळीचा प्रयत्न

पंचवटी : सम्राटनगर येथे शनिवारी (ता. २१) मध्यरात्री अठरा ते वीस गुन्हेगार वृत्तीच्या टवाळखोरांनी एका महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून जाळपोळ केली.

तसेच, आजूबाजूच्या घरांवर कोयत्याने हल्ला करीत काही घरांच्या काचा फोडल्याची खळबळजनक घटना घडल्याने परिसरातील दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत पोलिसांनी चार संशयितांना कोयत्यासह ताब्यात घेतले आहे.

याबाबत पीडित महिलेने दिलेली माहिती अशी, की शनिवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास सुमारे वीस ते पंचवीस गुन्हेगार प्रवृत्तीच्या टवाळखोरांनी येथील रहिवाशांच्या घरावर कोयते आणि दगडफेक करीत महिलांना अश्लील शिवीगाळ केली. (Attempted arson by pouring petrol on woman house Four suspects with weapon detained along with Panic by criminals in Samrat Nagar Nashik News)

हेही वाचा: Nashik : 'जादूटोणाविरोधी कायदा रद्द करा'; नाशिकमध्ये साधू-महंत आक्रमक

याबाबत या महिलांनी त्यांना विचारणा केली असता, तुम्हाला काय करायचे ते करा सांगत शिव्यांची लाखोली सुरू ठेवली. यामुळे भयभीत झालेल्या महिलांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोचत संशयित प्रशांत राजेंद्र निकम (२८, रा. अवधूत वाडी, दिंडोरी रोड,) बबलू हेमंत शर्मा, (१९, रा. अवधूत वाडी, दिंडोरी रोड,) दीपक किसन चोथवे, (३४, रा. अश्वमेध नगर, दिंडोरी रोड,) सुनील निवृत्ती पगारे, (२४, रा. अवधूत वाडी, दिंडोरी रोड) या चौघांना अटक करून त्यांच्याकडून कोयते जप्त केले.

तर, त्यांचे इतर साथीदार फरार झाले होते. चौघा साथीदारांना पोलिसांनी पकडल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या इतर साथीदारांनी पुन्हा सम्राटनगर येथे येऊन संगीताबाई पुंडलिक बोडके (४०) या महिलेच्या घरावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकून घराला आग लावली. या आगीमध्ये महिलेच्या घराचा दरवाजा, पडदा, बाहेर वाळत टाकलेले कपडे जळून खाक झाले.

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Nashik News : विल्होळीत संशयास्पदरित्या युवकाचा मृतदेह आढळला

तर, पद्मा दामू लोंढे या महिलेच्या घराच्या खिडक्यांच्या काचा कोयत्याने वार करून फोडण्यात आल्या. या टोळक्याने आजूबाजूच्या अनेक घरांवर कोयते मारून दहशत केली. काहींनी घरांवर दगडफेक केली. या घटनेने घाबरलेल्या महिला आपले घर सोडून इतरांच्या घरी रात्रभर राहिले. सकाळ झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना बोलावून त्यांनी रात्री आपबिती कथन करीत संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: Kolhapur Crime News: नोटा बनविण्यासाठी कोल्हापुरात दुकानांतून खरेदी केले साहित्य

घरांच्या काचा फोडून दगडफेक

संशयितांनी सम्राटनगर येथे दहशत पसरविल्याने ८ पोलिसांनी धाव घेत चौघांना अटक केली. मात्र, महिलेच्या घराला आग लावून पेटवून दिल्याची माहिती पोलिसांना मिळालेली नव्हती हे विशेष. तसेच, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांच्या काचा फोडण्यात आल्याचा आणि दगडफेक केल्याचा प्रकारदेखील पोलिसांना समजला नसल्याने येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

"रात्री काही संशयितांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल होत चार संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून कोयते जप्त केले आहे. तक्रार देण्यास कोणीही पुढे आले नसल्याने पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घर जाळले असल्याची माहिती पीडितांनी दिलेली नाही. तरी आम्ही स्वतः जाऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करू."

- युवराज पत्की, पोलिस निरीक्षक (गुन्हे)

हेही वाचा: Akola Crime News: उद्योजकाची ५० लाखाने फसवणूक; गुन्हा दाखल