मनमाड- काही दिवसांपूर्वीच सिकंदर भागात पाचवर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न उधळल्यानंतर मनमाड शहर पुन्हा एकदा हादरले आहे. गुरुवारी (ता. १७) उपजिल्हा रुग्णालयात तीनवर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा डाव फसला आणि बालिकेला वाचवण्यात यश आले. आरोपीस नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.