Nashik Crime News : डॉ. पवार यांच्या हत्त्येचाच होता कट! 16 दिवसांनी गुन्ह्याची उकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suspect Arrested

Nashik Crime News : डॉ. पवार यांच्या हत्त्येचाच होता कट! 16 दिवसांनी गुन्ह्याची उकल

नाशिक : दिवंगत आ. डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या डॉ. प्राची पवार यांना जीवे ठार मारण्याचाच कट रचून प्राणघातक हल्ल्या केल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यातील मुख्य संशयिताची आत्या कोरोना काळात सुश्रुत रुग्णालयात उपचारदरम्यान मरण पावली होती.

त्याचा राग धरुन डॉ. प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ल्या केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेषत: यासाठी मुख्य संशयिताने अन्य दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची सुपारी दिल्याचेही तपासातून समोर आले असून, गुन्ह्याची उकल अखेर १६ दिवसांनी झाली आहे. (attempted murder of Dr prachi Pawar attack Crime solved after 16 days Nashik Crime News)

अभिषेक दीपक शिंदे (१९, रा. इंदुमती बंगला, प्रमोद महाजन गार्डनमागे, गंगापूर रोड), धनंजय अजय भवरे (१९, रा. काचणे, ता. देवळा, हल्ली रा. अवधूतवाडी, पंचवटी) व पवन रमेश सोनवणे(२२, रा. लोहोणेर, ता. बागलाण, हल्ली रा. सातपूर कॉलनी) अशी तिघा संशयितांची नावे आहेत.

अभिषेक हा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असून तो अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे. या गंभीर गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व तपास कुशल १० अधिकारी व ४० पोलीस अंमलदारांची १० पथकांनी सदरील गुन्हा उघड केल्याचे उमाप यांनी सांगितले.

शहरातील सुश्रूत हॉस्पिटलच्या मुख्य संचालक डॉ. प्राची पवार या गेल्या १३ तारखषला रात्री सव्वा सात वाजता इनोव्हा कारने गोवर्धन शिवारातील पवार फार्म हाऊसवर जात असतांना गेटवर अनोळखी तिघांनी हुज्जत घालत त्यांच्यावर कोयत्याने वार केले होते. तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर तपास सुरु झाला.

त्यात पवारांवर हल्ला केल्यावर तिघेही दुचाकीने नाशिक शहराच्या दिशेने वेगात पळून जातांना दुचाकीला अपघात झाला. त्यात ते जखमी झाले होते. त्यामुळे त्यांनी कोणत्यातरी रुग्णालयात उपचार केल्याची दाट शक्यता गृहित धरुन तिघांचे वर्णन व तांत्रिक माहिती, विश्लेषणानुसार माहिती घेतली. त्यात त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समजताच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरुन पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Devendra Fadanvis | निरीक्षक देशमुख यांची अतिरिक्त पोलिस महासंचालकातर्फे चौकशी : फडणवीस

अभिषेकने रचला हत्त्येचा कट

अभिषेक शिंदे याची आत्या कोरोना काळात १२ मे २०२१ रोजी सुश्रृत हॉस्पिटल येथे उपचार घेत होती. मात्र, उपचारादरम्यान त्या मरण पावल्या. त्यामुळे अभिषेकसह त्याचे आईवडील व सर्वच कुटुंब तणावात होते. आत्याच्या मृत्यूला डॉ. प्राची पवारच जबाबदार आहेत, याचा राग मनात धरून अभिषेकने त्याचा बेरोजगार मित्र धनंजय व पवनला प्रत्येकी १० हजार रुपये सुपारी देत डॉ. पवार यांच्या हत्येचा कट रचला होता.

त्यानुसार अभिषेकने भद्रकालीतून चॉपरसारखे हत्यार खरेदी केले. घटनेच्या दिवशी डॉ. प्राची पवार हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर त्यांच्या गाडीचा पाठलाग करुन संशयितांनी घटनास्थळ गाठले होते.

तपासी पथकाला २५ हजारांची बक्षिसी

अपर अधीक्षक माधुरी कांगणे-केदार, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, पेठच्या उपअधीक्षक कविता फडतरे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सारीका आहिरराव, पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, उपनिरीक्षक दीपक देसले, सुप्रिया अंभोरे, हवालदार गणेश वराडे, पोलिस नाईक संदीप हांडगे, विनोद गोसावी, संतोष नागरे, हवालदार प्रकाश साळुंके, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, कासार, सहारे यांनी गुन्हा उघड केला. त्यामुळे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या तपासी पथकाला २५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले.

हेही वाचा: Nashik News: ‘सावाना’ च्या 1 लाख 42 हजार पुस्तकांच्या सूची लिंकचे प्रभावळकरांच्या हस्ते लोकार्पण!