Devendra Fadanvis | निरीक्षक देशमुख यांची अतिरिक्त पोलिस महासंचालकातर्फे चौकशी : फडणवीस

devendra fadanvis
devendra fadanvis Esakal

नाशिक : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढते गुन्हेगारी आणि या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याकडून होणारी वसुली याबाबत आमदार नीतेश राणे यांनी आज (ता.२८) नागपूर येथील अधिवेशनामध्ये लक्षवेधीने प्रश्न उपस्थित केला.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ अतिरिक्त पोलिस महासंचालकामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. (Devendra Fadanvis statement Inquiry of Inspector Deshmukh by Additional Director General of Police nashik news)

सिडको परिसरातील अंबड औद्योगिक वसाहत परिसर असून या ठिकाणी कामगार बहुल परिसर आहे. या ठिकाणी टोळी युद्ध, अवैध धंदे राजरोजपणे सुरू राहतात. समाजकंटकांवर कारवाईपेक्षा त्यांना पोलिसांच्या वतीने आश्रय दिला जातो. पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख तक्रारदारांशी त्यांचे वर्तन योग्य असे नाही.

तसेच लोक प्रतिनिधींना धमकी दिली जाते. तसेच कार्यालयीन कर्मचारी प्रशांत नागरेही लोकांमध्ये दहशत माजवतो. देशमुख व नागरे यांनी त्यांच्याकडील मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आ. राणे यांनी केली.

फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

गृहमंत्री फडणवीस यांनी लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले, अंबड पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रशांत नागरे यांचा अंबड पोलिस ठाण्यातील कार्यकाळ संपला होता.

त्यांची बदली करण्यात येईल. निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्यामार्फत एका महिन्याच्या आत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

devendra fadanvis
Nashik News : येवला नगरपालिकेकडून 25 किलो प्लास्टिक जप्त

हे होत कारण..

अंबड हद्दीत एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल होत नव्हता. हे प्रकरण आ. नीतेश राणे यांच्यापर्यंत पोहोचल्यावर निरीक्षकासह कर्मचाऱ्याची अवैध वसुलीची माहिती काढण्यात आली. त्यांच्या अवैध मालमत्तेसह वसुलीचे दाखले मिळाल्यानंतर बुधवारी (ता.२८) विधिमंडळात आ राणे यांनी लक्षवेधी मांडली.

वादग्रस्त कारभार

अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस देशमुख यांचा कारभार वादग्रस्त राहिला. हफ्तेखोरी, अवैध धंद्यांना राजाश्रय, खून, मारामाऱ्या, भंगार व्यावसायिकांवर वरदहस्त राहिल्याने परिसरात भंगार व्यवसाय पुन्हा सुरू झाला. लव जिहादचे प्रकरण समोर येऊनही देशमुख यांनी तक्रारदारापेक्षा संशयिताचे समर्थन करत तक्रारदाराला धमकावण्याचा प्रयत्न केला होता.

"पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्या बदली संदर्भात सायंकाळपर्यंत कुठलेही आदेश वजा सूचना प्राप्त झालेली नाही." - चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त

devendra fadanvis
Nashik News : दराअभावी भाजीपाला रस्त्यावर; अस्मानी सुलतानी संकटाने बळीराजा हतबल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com