नव्या पोस्टींगकडे लक्ष! पोलिस ठाण्यांना मिळणार नवीन कारभारी

police
policeesakal
Updated on

नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या (police officers transfer) झाल्या आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील बहुतांश अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

रिक्त पोलिस ठाण्यांना नवीन कारभारी महिन्याअखेरीस मिळणार

नाशिकमध्ये पंचवटी, म्हसरुळसह ग्रामीण भागातील अनेक पोलिस ठाण्याचे निरीक्षकांचा समावेश आहे. रिक्त पोलिस ठाण्यांना नवीन कारभारी महिन्याअखेरीस मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील २९४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यातील पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर म्हसरुळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांची ग्रामीण विभागात बदली झाली आहे. नम्रता देसाई, भरतसिंग पराडके, विजय पन्हाळे, अनिल पवार यांची शहर पोलिस आयुक्तालयाबाहेर बदली झाली आहे. विविध भागातील अधिकारी नाशिक शहरात बदलून आले आहेत. त्यात ज्योती आमने, युवराज पत्की, सुरेखा पाटील, प्रकाश पवार, संजयकुमार गावीत, दिनकर कदम, संजय गायकवाड, यशवंत बावीस्कर, पगार जाधव, अनिल पवार, सुनील जाधव, ग्रामीण बजरंग चौगुले, पुष्पा रामदास निमसे, रघुनाथ शेगर, विशाल वसंत गिरी, विलास आत्माराम शेळके, दीपक गिरमे, समाधान वाघ, माधवी वाघ, संदीप वराडे, अविनाश येवला आदींच्या शहर- जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत.

police
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस नव्या चेहऱ्यांच्या शोधात!
police
नाशिक : गडकरींच्या 'त्या' ट्विटनंतर भाजप-शिवसेनेत श्रेयवाद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com