NDCC Bank News : 10 लाखांवरील बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; यादी जाहीर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून लिलाव प्रक्रीया सुरू
NDCC Bank Nashik
NDCC Bank Nashikesakal

NDCC Bank News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ५५ हजार कर्ज बुडव्यांमुळे ११ लाख बॅंकेचे ठेवीदार अडचणीत सापडले आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत आठवड्यात थकीत कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश दिले.

यावर बॅंकेच्या ठेवीदार, सभासद आणि कर्मचारी वर्गात संतप्त भावना व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे, जिल्हा बँकेने मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर वसुलीची कार्यवाही सुरू केली आहे.

अशा ६७ बड्या थकबाकीदारांची यादीच प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. (Auction process started by NDCC bank nashik News)

जिल्हा बँकेचा सन २०२३-२०२४ कर्ज वसुली हंगाम सुरू असल्याने बँकेची जिल्ह्यातील ५५ हजार ७३७ थकबाकीदार सभासदाकडे २ हजार ३६५ कोटीचे (मुद्दल +व्याज) कर्ज थकविल्यामुळे बॅक आर्थिक अडचणीत सापडली आहे.

यंदाच्या वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली होण्याकामी व बँकेच्या खातेदारांना ठेवींची/खात्यावरील त्यांची बचतीची रक्कम उपलब्ध होण्यासाठी बँकेने वसुलीबाबत आढावा बैठक झाली.

जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु केली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

NDCC Bank Nashik
ZP FMS System : पंचायत समित्यांनाही आता झेडपी एफएमएस प्रणाली; विविध कामांमध्ये उपयोगी

त्यानुसार बँकेने जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे वारंवार थकीत कर्ज भरण्यासाठी सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये योग्य त्या कर्ज मागणी नोटिसा देऊनही व वारंवार सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नाही

. अशा सन २०१६ पूर्वीच्या मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदांच्या तालुकानिहाय याद्या तयार करून १० लाखावरील थकबाकीदार सभासदांचे टप्प्याटप्प्याने लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.

यात चांदवड तालुक्यातील १३, येवला तालुक्यातील १५, कळवणमधील १५ निफाडमधील ११ तर, दिंडोरी तालुक्यातील १२ थकबाकीदारांचा समावेश आहे.

NDCC Bank Nashik
ZP Employee Bank Election : जि. प. कर्मचारी बॅंक निवडणुकीसाठी 189 हरकती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com