Damages Crops
sakal
नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे चार हजार १४ हेक्टरवरील पिके पाण्यात गेली. त्यामुळे सात हजार १०८ शेतकऱ्यांना फटका बसला होता. या बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने तीन कोटी ८१ लाख ६७ हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीअंक्षी दिलासा मिळणार आहे.