Crime
sakal
नाशिक: आयटीआय सिग्नल परिसरातील औरा बार अॅन्ड रेस्टॉरंट येथे शनिवारी (ता. ४) मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन गटांमध्ये हाणामारी झाली. पीएल ग्रुपचा कुख्यात गुंड भूषण लोंढेच्या बाउंसरकडून हत्यारांच्या वापरासह गोळीबार केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. संशयित लोंढेसह त्याच्या कार्यकर्त्यांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.