esakal | नाशिकमध्ये रिक्षाचालकाकडून एकावर कोयत्याने वार; परिसरात भीतीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

नाशिकमध्ये रिक्षाचालकाकडून एकावर कोयत्याने वार

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : अतिरिक्त पैशाची मागणी करत रिक्षा चालकाकडून दोघांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता.१५) सकाळी घडली. एकावर कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. रिक्षाचालक फरार झाला असून, भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (autorickshaw driver attacked a man with a sharp weapon)

विजय वसंत जाधव (५०, रा. आडगाव) सीबीएस येथे जाण्यासाठी रविवार कारंजा भागातून (एमएच- १५- एचई- २८४२) रिक्षाने जाण्यास निघाले. त्यासाठी दहा रुपये भाडे ठरले. सीबीएस येथे रिक्षा पोचताच चालकाने वीस रुपयांची मागणी केली. त्यावरून जाधव आणि रिक्षाचालक यांच्यात वाद झाला. रिक्षाचालकाने त्यांना मारहाण केली. दरम्यान, सीबीएस मेघदूत शॉपिंग सेंटर येथील पार्किंग चालक सागर छबू निकम (३४, रा. कालिका मंदिर परिसर) वाद सोडवण्यासाठी गेले. त्यांनादेखील रिक्षाचालकाने मारहाण केली. कोयत्याने हात-पायावर वार केले. त्यात सागर निकम गंभीर जखमी झाला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर त्यांच्या तक्रारीवरून संशयितांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर रिक्षा चालक फरार झाला आहे. जखमी अवस्थेत सागर याने सतर्कता दाखवत रिक्षाचा क्रमांक लिहून घेतला. दिवसाढवळ्या सीबीएस चौकात कोयत्याने वार झाल्याने काही वेळ परिसरात भीतीचे वातावरण होते.

(autorickshaw driver attacked a man with a sharp weapon)

हेही वाचा: नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात १६२ रुग्ण कोरोना बाधित

loading image