esakal | नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात १६२ रुग्ण कोरोना बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

corona

नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात १६२ रुग्ण कोरोना बाधित

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात मृतांची संख्या तुलनेने अद्यापही चिंताजनक आहे. गुरुवारी (ता.१५) जिल्‍ह्यात सहा बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. दिवसभरात १६२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर १५७ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत एकने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत एक हजार ६६१ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (162 corona positive patients reported in nashik district)


गुरुवारी झालेल्‍या सहा मृत्‍यूंमध्ये नाशिक महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रात प्रत्‍येकी तीन बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधित रुग्‍णांमध्ये नाशिक ग्रामीणमधील ९१, नाशिक महापालिका क्षेत्रात ६३, मालेगाव महापालिका क्षेत्रात एक, जिल्‍हा बाहेरील सात रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

प्रलंबित अहवालाच्‍या प्रमाणात वाढ झाली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ८४६ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. नाशिक ग्रामीण क्षेत्रातील सर्वाधिक एक हजार ४०२ अहवाल प्रलंबित होते. मालेगाव क्षेत्रात २६६, नाशिक महापालिका क्षेत्रात १७८ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५८० रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ५४२ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात चार रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीण क्षेत्रात २४, मालेगावला दहा रुग्‍ण आढळले. जिल्‍ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या तीन लाख ९६ हजार ८७८ झाली असून, यापैकी तीन लाख ८६ हजार ७६७ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आठ हजार ४५० बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.


(162 corona positive patients reported in nashik district)

हेही वाचा: मांजरपाडा धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण; पालकमंत्र्यांची माहिती

loading image