खामखेडा: दारिद्र्य व बिकट परिस्थितीचा सामना करीत खामखेडा येथील आदिवासी वस्तीतील अशिक्षित शेतमजुराचा मुलगा अविनाश सोनवणे याने मेहनत व जिद्दीच्या जोरावर वर्दीचा राजमार्ग सुकर केला. मुंबई पोलिस म्हणून निवड झालेल्या अविनाशच्या यशाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे.