JEE Mains Exam 2024 : जेईई मेन्‍स निकालाची प्रतीक्षा, अंतिम उत्तर तालिका जाहीर

जॉइंट एंट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स परीक्षेच्‍या जानेवारी महिन्‍यात झालेल्‍या प्रथम सत्रातील निकाल सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झाला नव्‍हता.
JEE Mains Exam 2024
JEE Mains Exam 2024esakal

JEE Mains Exam 2024 : जॉइंट एंट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स परीक्षेच्‍या जानेवारी महिन्‍यात झालेल्‍या प्रथम सत्रातील निकाल सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झाला नव्‍हता.

सोमवारी (ता.१२) अंतिम उत्तरतालिका (ॲन्‍सर की) जाहीर करण्यात आली असली तरी विद्यार्थी, पालकांना निकालाची प्रतीक्षा कायम राहिली. (Awaiting JEE Mains Result Final Answer Table Declared nashik news )

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे जेईई मेन्‍स परीक्षेचे आयोजन केले जाते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासाठी गेल्‍या महिन्‍यात ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. नाशिकमधून सुमारे दहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सोमवारी निकाल जाहीर होणे अपेक्षित होते.

JEE Mains Exam 2024
JEE Main Exam : ‘जेईई मेन्‍स’मध्ये नाशिकचे विद्यार्थी चमकले

परंतु सायंकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर झालेला नव्‍हता. एनटीएने उत्तरतालिकेसंदर्भात हरकती नोंदविण्यासाठी वाढीव मुदत दिलेली होती. त्‍यामुळे सोमवारी अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आल्‍याने निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मध्यरात्री उशिरा किंवा मंगळवारी (ता.१३) निकाल जाहीर होईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

दुसऱ्या सत्रातील नोंदणीसाठी २ मार्चपर्यंत मुदत

विद्यार्थ्यांना जेईई मेन्‍स परीक्षेच्‍या दोन संधी उपलब्‍ध असतात. त्‍यानुसार ४ ते १५ एप्रिल या कालावधीत दुसऱ्या सत्रातील परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना येत्‍या २ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या दोन्‍ही सत्रांपैकी सर्वोत्तम कामगिरी असलेल्‍या परीक्षेतील निकाल हा गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरला जाणार असून, त्‍याआधारावर जेईई ॲडवास्‍ड परीक्षेसाठी पात्रता निश्‍चित केली जाणार आहे.

JEE Mains Exam 2024
JEE Mains Exam 2024 : जेईई मेन्‍स पेपर-2 ला 700 विद्यार्थी हजर; शनिवारपासून 2 सत्रांमध्ये पेपर-1चे आयोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com