Jayakumar Rawal : सोयाबीन खरेदी नोंदणीस मुदत : जयकुमार रावल; राज्यात शेतकऱ्यांना हजार कोटींचा मोबदला
Dhule News : किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख ३४ हजार ३३१ टन इतकी विक्रमी खरेदी झाली आहे.
धुळे : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.