
Ambedkar Jayanti: 131 किलोंचा केक ते भीमसैनिकांची गर्दी; पाहा फोटो
डॉ. बाबासाहेब यांच्या १३१ व्या जयंतीनिमीत्त नाशिक रोड येथे मोठ्या प्रमाणावर भीमसैनिकांची गर्दी जमली होती. त्यादरम्यान १३१ किलोंचा केक कापण्यात आला आहे.

नाशिक रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली आहे. छायाचित्र-अंबादास शिंदे

आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक जमा झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर अतिउत्साहात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयजयकार करत 131 वी भीम जयंती साजरी केली. त्यावेळी नेते छगन भुजबळ उपस्थित होते. छायाचित्र-केशव मते

दोन वर्षापासून कोरॉना निर्बंधामुळे भीमसैनिकांना आंबेडकर जयंती चा आनंद घेता आला नव्हता. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना भाविक. छायाचित्र-अंबादास शिंदे

१३१ व्या आंबेडकर जयंतीनिमित्त १३१ किलोंचा केक कापण्यात आला आहे. सर्वत्र निळे झेंडे पारंपारिक वाद्य डीजे च्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली. छायाचित्र-केशव मते

यावेळी नागपूरच्या दीक्षाभूमी चा देखावा करण्यात आला होता. हा देखावा भीमसैनिकांचा मुख्य आकर्षण ठरला. छायाचित्र-अंबादास शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला होता. छायाचित्र-अंबादास शिंदे
Web Title: Babasaheb Ambedkar Jayanti 2022 Nashik Photos
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..