नाशिक : जिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेस आमानुष मारहाण; बाळाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baby dies after inhuman beating of pregnant woman at Nashik District Hospital

नाशिक : जिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेस मारहाण; बाळाचा मृत्यू

वाडीवऱ्हे (नाशिक) : बाळंतपणासाठी जिल्हा शासकीय रूग्नालयात दाखल झालेल्या महिलेस अमानुष मारहाण केल्याने बाळाच्या मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान कारणीभूत आसलेल्या कर्मचाऱ्यांवर तसेच बाळंतपणासाठी गैरहजर रहाणाऱ्या वैद्यकीय आधिकाऱ्यावर करवाई करावी आशी मागणी श्रमजीवी संघटनेने जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांच्याकडे केली आहे.

९ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता पेठ येथून बाळंतपणासाठी हिरा कैलास गारे ही महिला दाखल झाली. पोटात कळा येऊ लागल्याने व जोराची लघवी लागल्याने ती बाथरूम कडे जात आसता त्याठिकाणी कामावर आसलेल्या सफाई कमगाराने आडवले व बाथरूम कडे जाऊ दिले नाही तसेचआर्वाच्य व अश्लिल भाषेत शिवीगाळ करून भिंतीवर लोटले, जर पुन्हा इकडे फिरकलीस तर पोलिस केस करून जेलमध्ये पाठविल, तिथेच तुझे बाळांतपण होईल असे धमकावले. गालात मारून धक्कामारून भिंतीवर लोटले. पोटावर मार लागल्याने पोटातील बाळाला धक्का लागला. सकाळी तिचे बाळंतपण करण्यात आले. बाळतपणाला वैद्यकीय आधिकारी ऊपस्थीत नव्हते. ज्युनियर कर्मचाऱ्यांकडुन बाळंतपण कले. पुरेसा आनुभव नसल्याने बाळ त्यांच्या हातातुन निसटल्याने खाली पडले बाळाच्या डोक्याला मार लागल्याने बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला काचेच्या पेटीत ठेऊन ऊपचार केले. आज त्या बाळाचा मृत्यू झाला.

हेही वाचा: नाशिक : इगतपुरीत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

दरम्यान मृत्युस कारणीभूत आसलेल्या मारहाण करणाऱ्या सफाई कमगारावर व बाळातपणास गैरहजर रहाणाऱ्या वैद्यकीय आधिकाऱ्यांवर कारवाई करावी आशी मागणी श्रमजीवी संघटनेचे नाशिक तालुका आध्यक्ष आर्जुन भोई, कैलास गारे, आरून चौधरी, प्रदिप माळेकर, किसन देशमुख, यांनी जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांच्याकडे केली आहे.

जिल्हा रूग्नालयातील सफाई कामगार व वैद्यकीय आधिकारी यांच्यामुळे मृत्यु झाला आहे.आठ तासापासून बाळाचा मृत देह जिल्हा रूग्नालयामध्ये पडून आहे. दोषींवर कारवाई करीत नाही तो पर्यत बाळाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका पालक व नातेवाईकानी घेतली आहे. बाळाची आई तक्रार दाखल करण्यासाठी सरकार वाडा पोलिस स्टेशनमध्ये डॉक्टर आणि सफाई कामगार विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादूर्भाव

loading image
go to top