नाशिक- वणी रस्त्याने प्रवास नको रे बाबा! जागोजागी खड्डे, प्रवास करायचा तरी कसा?

ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जाणे म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखेच आहे.
Patholes
Patholesesakal

लखमापूर (जि. नाशिक) : नाशिक - दिंडोरी - वणी - कळवण या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जाणे म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखेच आहे. वाहनांचे नुकसान आणि वाढणारा वेळ यामुळे या रस्त्याने प्रवास नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. प्रशासनाला मात्र या काहीही सोयरसुतक नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मतदारसंघातील हा रस्ता कधी दुरूस्त होणार अशी टीका करीत गुजरातचे पर्यटक आता इकडून यायचेच नाही अशी उपरोधिक टोमणे मारत आहेत. (Latest Marathi News)

Patholes
शिवसैनिक जिकडे असतील तिकडे सत्ता येते - उद्धव ठाकरे

खड्यांमुळे दुचाकी, चारचाकी चालकांना रस्त्याने ये - जा करतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना दुचाकीधारकांना खड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे नव्या वाहनांचा अक्षरक्षः बोजवारा उडाला आहे. नाशिक - दिंडोरी - वणी - कळवण रस्त्याला नेहमी रहदारी असते. खड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वारांना रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने दररोज अपघात होत आहेत. नाशिक - वणी - कळवण- अभोणा येथील नागरिकांचा दररोजचा या रस्त्याने राबता असल्याने पाठीच्या मणक्यांचे आजाराचे दुखणे वाढले आहे.

जिल्ह्यातील दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र, साडेतीन पिठांपैकी अर्धे शक्तीपिठ समजल्या जाणाऱ्या वणी येथील सप्तश्रृंगीगडावर भाविक महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरून देखील वणी सप्तश्रृंगीगडावर देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तीभावाने येतात. नाशिक कळवण ररस्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवासी व वाहनधारक यांच्याकडून केली जात आहे.

Patholes
जाणून घ्या काय आहेत heart attackची लक्षणे

खराब रस्त्याअभावी वाहने पंचर होणे, टायर फुटणे, पाटे तुटणे अशा या तक्रारींमुळे चारचाकी वाहनधारक अक्ष:रक्षा धास्तावले आहेत. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडल्याने शेतकरी वर्ग नाशिक बाजार पेठेत याच महामार्गाचा वापर करतात. या महामार्गावरून नाशिक बाजारपेठेत कळवण, अभोणा आदी ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात शेतीमाल शेतकरी वर्ग आणत असतात. रस्त्याअभावी शेतीमाल नेणेही अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दखल घेत दुरूस्ती करावी अशी मागणी दिंडोरी, कळवण तालुक्यातील शेतकरी वर्ग, विद्यार्थी, नोकरवर्ग, कामगार, प्रवासी आदींनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com