महावितरणचा मनमानी कारभार; माळमाथा परिसरातील शेतकरी हैराण

mahavitaran
mahavitaranesakal

मालेगाव (जि. नाशिक) : महावितरण कंपनीच्या (MSEDCL) मनमानी व भोंगळ कारभारामुळे माळमाथ्यासह चिखलओहोळ परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीजग्राहकांना चुकीचे बीले देणे, अवाजवी लोडशेडिंग, चुकीचे मीटर रिडींग, वाढीव स्वरुपात वीजबीले (Electricity Bill) यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. यातच चिखलओहोळ परिसरात तब्बल महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. महिन्यात १० ते १२ दिवस गाव अंधारातच होते. ज्या दिवशी लाईट असते त्या दिवशी तासाआड पुरवठा खंडीत होतो. साधारणपणे पाच ते सहा तास वीज ग्राहकांना उपलब्ध होत आहे. शेतीकामे, लघुउद्योग व घरगुती व्यवसायांना त्याचा फटका बसत आहे. (Bad management of MSEDCL Harassment of farmers in Malmatha area Nashik News)

वारंवारच्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे शेतीकामांना ब्रेक लागला आहे. पिण्याच्या पाण्याचे संकटही ओढवले आहे. चिखलआहोळ येथील ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे माळमाथ्यावरील माणके, दहीकुटे, सायने या गावातील वीजपुरवठा देखील खंडित झाला. दुपारी खंडीत झालेला वीजपुरवठा आज दुपारी दीडच्या दरम्यान सुरळीत झाला. यामुळे एक दिवस अंधारात राहिले. त्यातच नियमितपणे दोन- तीन तासाचे भारनियमन आहेच. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून खंडीत वीजपुरवठ्याबाबत कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
वीजेअभावी डास, मच्छर यांचे साम्राज्य वाढल्याने साथ आजारांची लागण होण्याची शक्यता वाढली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना जणू ग्राहकांच्या तक्रारींचे काही एक देणे घेणे नाही. असे त्यांचे वर्तन आहे, असे उपसरपंच रोहिणी देशमुख, ग्रामपंचायत सदस्य व माळमाथ्यावरील नागरिकांचे म्हणणे आहे.

mahavitaran
पावसाळ्यातही 53 गावे-वस्त्यांची टँकर भागवताय तहान!

"वेळेवर बिल न भरल्यास सक्तीची वसुली, दंड आकारणी तसेच, वीजपुरवठा खंडीत केला जातो. याउलट महावितरण वीजपुरवठा सुरळीत करण्यास व नियमित वीज देण्यास अपयशी ठरत आहेत. यात सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालू. " - राजश्री बोरसे, सरपंच, चिखलओहोळ

mahavitaran
नाशकात धो-धो : मुसळधार पावसाने नागरिकांची फजिती; पाहा Photos

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com