Salim Kutta Dance Case: गुन्हेशाखेच्या चौकशीला बडगुजर अनुपस्थित! सलिम कुत्ता डान्सप्रकरणी साक्षीदारांची गोपनीय चौकशी

Salim Kutta Dance Case
Salim Kutta Dance CaseEsakal
Updated on

नाशिक : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी महंमद सलिम मीर शेख उर्फ सलिम कुत्ता याच्यासमवेत पार्टीमध्ये डान्स केल्याप्रकरणी उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची शहर गुन्हेशाखेकडून सुरू असलेल्या चौकशीच्या चौथ्या दिवशी ते अनुपस्थित राहिले. \

प्रकृती अस्वस्थामुळे बडगुजर हे चौकशीला हजर राहू शकले नसल्याचे सांगण्यात येते. तर, या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या साक्षीदारांची शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने गोपनीय चौकशी केल्याचे समजते.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सलिम कुत्ता २०१६ मध्ये नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता. त्याचवेळी राजकीय आंदोलनामुळे उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर न्यायालयीन कोठडीत होते.

त्यावेळी त्यांची ओळख झाल्याचे बोलले जाते. त्यानंतर पॅरोलवर असताना सलिम कुत्ता याच्यासमवेत आडगाव परिसरातील एका फार्महाऊसवर पार्टी आयोजित करण्यात आली असता, त्यात सलिम कुत्ता व सुधाकर बडगुजर हे डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीही उपस्थित करण्यात आली आहे.

याचप्रकरणी शहर गुन्हेशाखेतर्फे युनिट एकमध्ये बडगुजर यांची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. सोमवारी (ता.१८) देखील त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आलेले होते.

परंतु त्यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणास्तव चौकशीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळविले होते. त्यानुसार ते चौथ्या दिवशी चौकशीला अनुपस्थित राहिले.

मात्र, पोलिसांनी या पार्टींमध्ये सहभागी झालेल्या काही प्रत्यक्ष साक्षीदारांची गोपनीयरित्या चौकशी केल्याचे समजते.

Salim Kutta Dance Case
Salim Kutta : दाऊद टोळीतील गुंड सलीम कुत्ता सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात

व्हिडिओ काढणाऱ्याचीही चौकशी

२०१६ मधील या डान्सपार्टीमध्ये सराईत गुन्हेगारही उपस्थित होता. त्या सराईत गुन्हेगारानेच तो व्हिडिओ काढल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

काही महिन्यांपूर्वीच खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला व सध्या जामीनावर बाहेर असलेल्या या सराईत गुन्हेगाराचीही गुन्हेशाखेच्या युनिट एकमध्ये चौकशी करण्यात आली आहे.

सलिम कुत्ता येरवड्यात

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला दहशतवादी सलिम कुत्ता यास एकाच कारागृहात ठेवले जात नाहीत. औरंगाबाद कारागृहातून तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आला होता.

२०१६ मध्येच त्यास येरवडा कारागृहात हलविण्यात आले असून, सध्या तो त्याच कारागृहाच्या अंडरसेलमध्ये आहे. येरवडा कारागृहात असल्यापासून त्यास एकदाही पॅरोल रजा देण्यात आलेली नाही.

डान्सप्रकरणी सलिम कुत्ता याचा नाशिक पोलिसांकडून जबाब घेतला जाणार आहे, परंतु त्यासाठी न्यायालयाकडे कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. न्यायालयाच्या मंजुरीनंतरच सलिम कुत्ताचा जबाब घेता येणार आहे.

"सलिम कुत्तासमवेत बडगुजर यांच्या डान्सपार्टी प्रकरणी सलिम कुत्ता याचा जबाब घेण्यासाठी नाशिक पोलिसांचे कोणतेही पथक गेलेले नाही."

- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हेशाखा, नाशिक

Salim Kutta Dance Case
Salim Kutta Case: ठाकरे गटाकडून राणेंचा पुतळा दहनाचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com