Sudhakar Badgujar Fraud Case: बडगुजरांना अपहारप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; अंतरिम जामीन सुनावणीला गैरहजर

‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आक्षेप घेण्यात आल्याने बडगुजर यांच्यासह दोघांना येत्या १७ तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Sudhakar Badgujar Fraud Case
Sudhakar Badgujar Fraud Caseesakal

नाशिक : महापालिकेच्या विविध कामांचा ठेका घेत नगरसेवक पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेच्या उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे अंतरिम जामीन सुनावणीवेळी मंगळवारी (ता.९) न्यायालयात गैरहजर राहिले.

त्यावर ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आक्षेप घेण्यात आल्याने बडगुजर यांच्यासह दोघांना येत्या १७ तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Badgujar ordered to appear in court in embezzlement case Absence of interim bail hearing nashik Crime news)

सुधाकर भिका बडगुजर, साहेबराव रामदास शिंदे, सुरेश भिका चव्हाण या तिघांविरोधात सरकारवाडा पोलिसात अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना चौकशीसाठी बोलाविले असता, बडगुजर यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत अंतरिम जामीन मिळविला होता.

या अंतरिम जामीनची मुदत मंगळवारी (ता.९) संपल्याने सदरचा अंतरिम जामीन नियमित करण्यासाठी न्यायालयात सुनावणी होती. परंतु यावेळी सुधाकर बडगुजर यांच्यासह तिघेही न्यायालयात गैरहजर होते.

त्यावर सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी आक्षेप नोंदविला. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी विश्वजित जाधव यांनीही युक्तिवाद केला.

Sudhakar Badgujar Fraud Case
Cyber Fraud: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं साडेचार कोटींची फसवणूक; पोलिसांनी वाचवले ३.७० कोटी रुपये

त्यामुळे न्यायालयाने अंतरिम जामीन नियमित न करता तिघा संशयितांना येत्या १७ तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.

२०१६ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

या तक्रार अर्जांची ‘लाचलुचपत’च्या पथकाने खुली चौकशी करून तपासीअंती गेल्या १७ तारखेला गुन्हा दाखल केला आहे. यात बडगुजर यांच्यासह तिघांना अंतरिम जामीन मंजूर करीत दिलासा मिळाला होता.

Sudhakar Badgujar Fraud Case
Nashik News: नायलॉन मांजाची होतेय सर्रास विक्री! सिन्नरकरांची सुरक्षा वाऱ्यावर; पोलीस अन नगरपालिकेची पथके कागदावरच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com