Cyber Fraud: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं साडेचार कोटींची फसवणूक; पोलिसांनी वाचवले ३.७० कोटी रुपये

सायबर गुन्हेगारीत आता मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पोलिसांसमोर हे नवं आव्हान उभं राहिलं आहे.
Cyber Fraud
Cyber Fraudesakal
Updated on

मुंबई : सायबर गुन्हेगारीत आता मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पोलिसांसमोर हे नवं आव्हान उभं राहिलं आहे. अशाच प्रकारची एक सायबर तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांनी दोन दिवसांत तपास करुन तब्बल ३.७० कोटी रुपयांची फसवणूक रोखली आहे. त्यामुळं पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. (Cyber Fraud Mumbai Police saved Rs 3.70 crore from cyber crime)

Cyber Fraud
Bilkis Bano Case: दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टानं का रद्द केला? कारण घ्या जाणून

सविस्तर माहिती अशी, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीत आकर्षक परताव्याची ऑफिर मिळाल्यानं तक्रारदारानं एकूण ४.५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. पण वेब साईटवर दाखवत असलेला नफा काढता येत नसल्याचं समजताच आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. (Marathi Tajya Batmya)

Cyber Fraud
Prakash Ambedkar: "दिवाळी साजरी करण्यासाठी गरिबांना 1 हजार रुपये द्या"; आंबेडकरांची PM मोदींना विनंती

याबाबत तक्रार समोर येताच ४८ तासांच्या आत मुंबई पोलिसांनी तब्बल ३.७० कोटी रूपये वाचवले. तक्रारदारानं या प्रकरणी 1930 या हेल्पलाइनवर कॉल केला होता. तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी तातडीनं संबंधित बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांची संपर्क साधून बँक खाती आली गोठवली. (Latest Marathi News)

Cyber Fraud
Pune Loksabha ByElection: पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार नाही! हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं दिली स्थगिती

दरम्यान, सायबर फसवणूक झाली असता तात्काळ १९३० हेल्पलाइनला कॉल करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. गेल्या वर्षभरात १९३० हेल्पलाईनच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी एकूण २६.४८ कोटी रुपये वाचवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com