Panchayat Raj
sakal
नामपूर: गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी बागलाण तालुका सज्ज झाला असून, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भय्यासाहेब सावंत यांनी केले आहे.