Nashik News: बागलाण तालुका संपूर्ण दुष्काळसदृशच्या यादीत येणार : आमदार बोरसे

MLA Dilip Borase
MLA Dilip Boraseesakal
Updated on

सटाणा : बागलाण तालुक्यात सहा मंडळे दुष्काळसदृश घोषित झाल्याने शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल. शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात येईल. कृषीपंपांच्या वीजबिलात ३३.५% सूट देण्यात येईल.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी मिळेल. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल.

आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू होतील. शेतीपंपांची वीज जोडणी खंडित केली जाणार नाही अशी माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली आहे. उर्वरित मंडळांचाही समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. (Baglan taluka will be on full drought list MLA Borse Nashik News)

MLA Dilip Borase
Maharashtra Drought: सोलापूर जिल्ह्यातील आणखी 46 मंडळामध्ये दुष्काळ जाहीर; कर्जवसुली थांबणार

याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार याप्रश्नी त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे तालुक्यातील सहा महसूल मंडळांमध्ये दुसऱ्या टप्प्यात दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दुष्काळ घोषित केला, त्यात बागलाण तालुक्याचा समावेश नव्हता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना होती.

नजर आणेवारी निश्चितीपूर्वीच आमदार बोरसे यांनी तहसीलदार कैलास चावडे यांना वस्तुस्थितीजन्य अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. सर्व गावांमध्ये आणेवारी ५० पैशाच्या आत असल्याचा अहवाल शासन स्तरावर सादर केला होता.

परंतु तरीही पहिल्या टप्प्यात तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश झालेला नव्हता. दुसऱ्या टप्प्यात बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, वीरगाव, मुल्हेर या मंडळांचा समावेश केला आहे.

राहिलेल्या मुंजवाड, किकवारी, साल्हेर, ब्राम्हणगाव, टेंबे आणि डांगसौंदाणे या मंडळांचाही समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यानंतर संपूर्ण तालुका दुष्काळी घोषित करण्यात येईल असे श्री. बोरसे यांनी सांगितले.

MLA Dilip Borase
Jalgaon Drought News: पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळी जाहीर; आमदार किशोर पाटील यांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com