Crime
sakal
पंचवटी: विसे मळा गोळीबार प्रकरणी नाशिक रोड कारागृहात असलेल्या बागूल टोळीच्या गुन्ह्यांमध्ये आणखी भर पडली आहे. जमीन व्यवहारातून प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत ५७ लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी तसेच जागेचा ताबा सोडण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयित संजय राठी, महेश राठी, अजय बागूल, मामा राजवाडे, बाळासाहेब ऊर्फ भगवंत पाठक व अन्य जणांविरुद्ध कारवाई सुरू असून, आतापर्यंत रेकॉर्डवर न आलेला पाठक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने बागूल टोळीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.