Bakri Eid 2023: ईदगाह मैदानास तलावाचे स्वरूप; मशिदीत नमाजपठणासाठी अतिरिक्त व्यवस्था

The form of a pond formed in the Eidgah plain by the accumulation of rainwater
The form of a pond formed in the Eidgah plain by the accumulation of rainwateresakal

Bakri Eid 2023 : शहरात संततधार सुरू आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. ईदगाह मैदानावरही मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने मैदानात तळ्याचे स्वरूप आले आहे.

हवामान खात्याकडून पुढील पाच ते सहा दिवस पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. (Bakri Eid 2023 Eidgah Maidan become lake by rain Additional arrangements for offering prayers in mosques nashik)

गुरुवारी (ता.२९) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ईदच्या तयारीस वेग आला आहे. बाजारपेठ विविध प्रकारच्या खरेदीसाठी गजबजलेली आहे. दोन दिवसापासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे.

त्यात हवामान खात्याकडून आगामी पाच ते सहा दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात ईदगाह मैदानावर सामुदायिक बकरी ईदची नमाज पठन केली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The form of a pond formed in the Eidgah plain by the accumulation of rainwater
Ashadhi Ekadashi Bakri Eid : जायखेड्यात कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय

ईदच्या दिवशी पाऊस झाल्यास ईदची नमाज ईदगाहवर पठण होणे शक्य होणार नाही. पावसाची शक्‍यता लक्षात घेता शहराच्या सर्वच मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांना नमाजपठणासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.

कुणाची ईदची नमाज सुटता कामा नये. यासाठी विविध मशिदीमध्ये नमाजची वेगवेगळी वेळ ठेवण्यात आली आहे.

The form of a pond formed in the Eidgah plain by the accumulation of rainwater
Ashadhi Ekadashi : CM शिंदे सहकुटुंब शासकीय महापूजेला हजर राहणार; किती वाजता असणार पूजा? जाणून घ्या शेड्यूल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com