Bala Nandgaonkar
sakal
नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये गुंतवणूक आणल्याचे सांगत असले, तरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुविधांचे काय, असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत. ‘‘राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये अनेक चांगली कामे केली; किमान ती टिकवली असती, तरी आभार मानले असते,’’ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपच्या नाकर्तेपणावर सडकून टीका केली.