तळोदा- कौटुंबिक, व्यावसायिक व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मातृत्व, अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळत, आयुष्यात आलेल्या प्रत्येक समस्येचा जिद्दीने व चिकाटीने सामना करीत चेतना माळी यांनी राष्ट्रीय पातळीवरची यूजीसी नेट राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. मराठी विषयात त्या नेट झाल्या असून, तळोदा माळी समाजातील त्या पहिल्या नेट उत्तीर्ण महिला आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.