'फटका बसल्यानेच केंद्राला उपरती झाली' : बाळासाहेब थोरात | Farm Law Repeal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb thorat

'फटका बसल्यानेच केंद्राला उपरती झाली' : बाळासाहेब थोरात


घोटी (जि. नाशिक) : देशात महागाईचा आगडोंब उसळलेला असून बेरोजगारीचा कळस झाला असताना टाळ्या अन थाळ्या वाजवून देशाचे वाटोळे झाले. ज्यांना देशाचा इतिहास भूगोल माहीत नाही, श्रीमंत व गरिबांना सर्वसामान्य हक्क संविधानाने प्रदान केले असे असतांना विरोधात बोलणाऱ्यांना पद्मश्री दिली जाते. कृषि कायद्यामुळे देशातील पोटनिवडणुकीत फटका बसल्याने ते मागे घेण्याची उपरती केंद्राला झाली, मात्र शेतकरी बांधवांचा हा सर्वात मोठा विजय आहे.

मोदी भक्तांनी शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी अंगावर वाहने घातली, रस्ते बंद केले. काँग्रेसने सत्याग्रह करून स्वातंत्य मिळवले. मोदी सरकारने कामगार हिताचे कायदे रद्द करून मालक धार्जिणे कायदे केले यासाठी जनतेने जनजागरण अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

गोंदे (ता. इगतपुरी) सायंकाळी सहाला मारोती मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. जनजागरण अभियानादरम्यान माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, राज्य कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पाटील पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक राहुल दिवे, प्रांतिक सदस्य कचरू पा. डुकरे, अँड संदीप गुळवे, उत्तम भोसले, भास्कर गुंजाळ, माजी सभापती गोपाळा लाहंगे, राजाराम धोंगडे, सरपंच शरद सोनवणे, उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे आदी उपस्थित होते. दरम्यान गोंदे ते वाडीवऱ्हे दरम्यान महसूलमंत्री थोरात यांनी पायी चालत जनजागरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवाहन केले असून असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते सोबत घेऊन मोदी सरकारच्या विरोधात रात्रभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे.

अभियान यशस्वी करावे

मोदी सरकारकडून एकाबाजूने अन्याय होत असताना दुसरीकडे काँग्रेसतर्फे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी महागाई, बेरोजगारी, नोटाबंदीबाबत लढा दिला जात आहे. सर्व शेतकरी पीक विमा भरत असतांना विमा कंपन्या टाळाटाळ करत आहे. विजबिले वारेमाप पद्धतीने लावली जात आहेत. अल्प भूधारक शेतकरी असूनही स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा अशी मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी करत देशभरात काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे. त्यास भक्कम पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.

loading image
go to top