नाशिक: स्वातंत्र्यदिनी गोंदिया येथे ध्वजारोहण करण्यावरून मंत्री छगन भुजबळांनी नाराजी वर्तविली असताना काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीत भुजबळांना मानसन्मान मिळत नाही, त्यांनी ही अवहेलना सहन करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.