Nashik : बाळासाहेबांचे नाशिककरांशी अतूट नाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेबांचे नाशिककरांशी अतूट नाते

नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालिमार येथील शिवसेना कार्यालयात आयोजित अभिवादन सोहळ्यात त्यांच्या आठवणी सांगताना उपस्थित जनसागरास अश्रू अनावर झाले. बाळासाहेबांचे नाशिककरांशी अतूट नाते होते. त्यांनी अनेकवेळा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नाशिकला भेटी दिल्याने प्रत्येक नेते आणि कार्यकर्त्यांना ते वैयक्तिकरित्या ओळखत होते. अनेकांशी त्यांचे खास जिव्हाळ्याचे नाते होते. बाळासाहेबांसारखा नेता यापुढे होणार नाही, असे मान्यवर नेत्यांनी त्यांना अभिवादन करताना सांगितले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावशाली आणि दमदार होते. ते कुशल व्यंगचित्रकार, प्रतिभावंत राजकारणी, उत्कृष्ट संपादक आणि उत्कृष्ट वक्ते होते. कणखर भाषाशैली हेही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य होते, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते माजीमंत्री बबन घोलप यांनी केले. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून त्यांनी महाराष्ट्रातील मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला,असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले. १९९५ साली शिवसेनाप्रणीत युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले होते. नाशिकमध्ये शिवसेनेचा मेळावा झाल्यानंतरच हे यश मिळाले याची जाणीव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होती.

त्यामुळेच नाशिकवर त्यांचे विशेष प्रेम होते. महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना एकत्रित करण्यास त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांची भूमिका मोलाची राहिली, असे सांगून महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्यांना अभिवादन केले.

या वेळी खासदार हेमंत गोडसे, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप, माजी महापौर विनायक पांडे, मनपा गटनेते विलास शिंदे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, सचिन मराठे, महेश बडवे, महानगर संघटक योगेश बेलदार, नाशिक रोड सभापती प्रशांत दिवे, सिडको सभापती सुवर्णा मटाले, संजय चव्हाण, मंदा दातीर, मंगला भास्कर, प्रेमलता जुन्नरे, शोभा मगर, शोभा गटकळ, लक्ष्मी ताठे यांच्यासह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top