Nashik News : पंचाळे गावाजवळ संत बाळूमामाच्या मेंढ्यांचा कळप चिरडला; 12 ते 15 मेंढ्यांचा मृत्यू

file photo
file photoesakal

नाशिक : सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावच्या शिवारात शहा-पंचाळे रस्त्याने जाणाऱ्या बाळूमामाच्या मेंढ्यांचा (Sheep) कळप भरधाव स्विफ्ट कारने चिरडल्याची घटना घडली.

शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास झालेले अपघातात 12 ते 15 मेंढ्या दगावल्या असून काही मेंढ्या जखमी झाल्याचे समजते. (Balumama herd of sheep was crushed in village of Panchla 12 to 15 sheep died nashik news)

सिन्नरच्या पूर्व भागात मिरगाव येथे बाळूमामाच्या तेरा नंबरच्या पालखीचा मुक्काम आहे. या पालखीसोबत असणारा सुमारे अडीचशे मेंढ्यांचा कळप पंचाळे शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसण्यासाठी येत होता.शहा -पंचाळे रस्त्याने हा कळप जात असताना शिंदेवाडी फाटा ते पंचाळे येथील सूर्यभान गडाख माध्यमिक विद्यालयाच्या दरम्यान हा अपघात घडला.

शहा बाजूकडून पंचाळेच्या दिशेने जाणारी भरदार स्विफ्ट कार थेट कळपात घुसली. यावेळी चेंदराचेंदरी होऊन मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. दरम्यान हा प्रकार समजल्यावर पंचाळे येथील ग्रामस्थांनी अपघात स्थळी येत जखमी मेंढ्यां वर खाजगी पशुवैद्यकाच्या मदतीने उपचार केले. या अपघाताचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी रस्त्यावरील वाहतूक अडवून धरली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

file photo
MSEDCL : राजपूर पांडे फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; गलथान कारभाराविरोधात रोष

याबाबत माहिती समजल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी अपघात स्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला. या घटनेत मृत झालेल्या मेंढ्यां वर स्थानिकांच्या मदतीने विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलीस पाटील शांताराम कोकाटे ,पोलीस हवालदार जयंत जगताप यांनी पंचनामा केला . या घटनेबाबत नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

file photo
Onion Rate : रस्त्यावर कांदे फेकत शेतकऱ्यांचा रास्तारोको

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com