NSK26H34177 (फोटो जागा असल्यास वापरावा, अन्यथा वापरू नये.)
बामखेडा : धूर फवारणी करताना आरोग्य कर्मचारी.
---
बामखेड्यातील सहावर्षीय
बालकाला डेंगीची लागण
सकाळ वृत्तसेवा
वडाळी, ता. ३१ : बामखेडा त.त. (ता. शहादा) येथील सहावर्षीय बालकाला डेंगीची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालात आढळले आहे. गेल्या पाच दिवसांपासून या बालकावर शिरपूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संबंधित बालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने शिरपूरला हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीत डेंग्यूच्या दोन चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. दरम्यान, परिसराची पाहणी, डास उत्पत्ती स्थळांची तपासणी, आवश्यक फवारणी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रशासनाने साथीचे आजार पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. समुदाय अधिकारी डॉ. विजय पावरा यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, की डेंग्यूचा रुग्ण आढळळ्याने संबंधित परिसरात भेट देऊन पाहणी केली आहे. सध्या परिसरात सर्वेक्षण सुरू आहे. पाहणीदरम्यान कुलरच्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात येत असून, धूरफवारणी करण्यात आली आहे.