दहिगाव (ता. यावल)/भुसावळ- जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात मोठी वाढ झाली असून, पारा ४४ अंशांवर गेला आहे. वाढत्या उन्हामुळे केळीच्या खोडांमधून केळीचे घड गळून पडत आहेत. यात शेतकऱ्यांचे दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. वाढत्या उष्म्यामुळे केळीवर काळे डाग पडत असून, फळाचा दर्जाही खालावत आहे. परिणामी, केळीचे उत्पादन घटण्याची चिन्हे असून, उत्पादक संकटात सापडले आहेत.