onion
sakal
नाशिक
Lasalgaon News : 'बांगलादेशचा निर्णय' कांदा उत्पादकांसाठी आशेचा किरण! लासलगावच्या बाजारपेठेत तेजीसाठी आता सरकारकडून जलद निर्यात धोरणाची मागणी
Bangladesh Allows Limited Onion Import From December 7 : बांगलादेश सरकारने कांदा आयातीला परवानगी दिल्यानंतर, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा निर्यातदार व शेतकऱ्यांच्या नजरा आता केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाकडे लागल्या आहेत.
लासलगाव: बांगलादेश सरकारने देशांतर्गत कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी ७ डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांद्याची आयात करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे केवळ बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या नजरा पुन्हा एकदा परकीय बाजारपेठेकडे वळल्या आहेत.
