Bank Fraud: बनावट लिंक क्लिक करू नका | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Bank Fraud

Bank Fraud: बनावट लिंक क्लिक करू नका

Nashik News- देशपातळीवरील एका नामांकित बँकेची बनावट लिंक हॅकर्सनी तयार केली आहे. हॅकर्सकडून ती लिंक व्हायरल करण्यात आलेली आहे.

या नामांकित बँकेचे ग्राहक असलेल्यांनी जर लिंक ओपन करून त्यावर असलेली माहिती भरताच, क्षणार्धात खाते रिकामे होते.

अशारितीने हॅकर्स अनेकांना गंडा घातल आहेत. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना बँकेच्याच संकेतस्थळावर वा ॲपवर जाऊन व्यवहार करावे असे आवाहन सायबर तज्‌ज्ञांनी केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. ऑनलाईन व्यवहारातून अनेकदा फसगतही होते.

परंतु तरीही बँकेने अनेक प्रकारच्या सुरक्षितता अंमलात आणले आहेत. तरीही हॅकर्सकडून नवनवीन फंडे वापरून ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना गंडा घालण्याचे काम सुरूच असते.

आता तर, हॅकर्सने एचडीएफसी बँकेची बनावट लिंक तयार केली आहे. ही लिंक ओरिजनल लिंकची साधर्म्य असल्याने, ग्राहकांचीही फसगत होते. या हॅकर्सकडून ही लिंक व्हायरल करण्यात आलेली आहे.

ही लिंक जर एचडीएफसी बँकेचेच ग्राहक असलेल्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी तिचा वापर करण्यासाठी लिंक ओपन केली अन त्यावर मागितलेली माहिती अर्थात बँकेच्या खातेक्रमांकांसह संपर्क क्रमांक भरून सबमिट केले.

तर अवघ्या काही सेंकदांमध्ये ग्राहकाच्या खाते रिकामे होण्याचे प्रकार घडत आहेत. अशारितीने हॅकर्सच्या या बनावट लिंकमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे.

तरी, ऑनलाईन व्यवहार करताना बँकांच्या खातेदारांनी लिंकची सत्यता पडताळवी असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.

हॅकर्सने बँकेच्या ओरिजनल लिंकप्रमाणेच बनावट लिंक तयार केली आहे. ती लिंक हॅकर्स व्हायरल करीत आहेत.

अशा व्हायरल लिंकवरून कोणीही आर्थिक व्यवहार करण्यासाठी ती ओपन करू नये.

अन्यथा आपले बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यापेक्षा बँकेच्या वेबसाईटवर जाऊन आपले आर्थिक व्यवहार करावेत. अनेकांची फसवणूक होत असल्याने जागरुकतेने आर्थिक व्यवहार करावेत. . .

- तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

टॅग्स :BankcrimeFraud Crime