March End Recovery : बँका, पतसंस्थांची कर्जवसुली जोरात; मार्च एंडमुळे वसुलीचा तगादा वाढल

March End Recovery
March End Recoveryesakal

चांदोरी (जि. नाशिक) : सध्या सर्वत्रच सहकारी, राष्ट्रीयीकृत बँका व पतसंस्थांनी सक्तीच्या कर्जवसुलीवर भर दिला आहे. वसुली पथके थेट कर्जदाराच्या घरी जाऊन वसुली करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

नवीन आर्थिक वर्षात नवीन व्यवहारांची सुरवात होणार असल्याने तत्पूर्वी जुने हिशेब पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. बँकांच्या या कर्जवसुलीमुळे मात्र कर्जदारांची धावपळ सुरू झाली आहे. (Banks Credit Institutions Debt Recovery in action end of March recovery will increase nashik news)

कर्जवसुलीसाठी बँकांकडून नोटीस देऊन न्यायालयीन व फौजदारी कारवाई करण्याचे सांगितले जात आहे.कोरोनामुळे गेली दोन वर्षे सर्वांचीच अडचणीची गेली आहेत. अगदी चहा टपरीपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वजण आर्थिक अडचणीत सापडले होते.

सध्या पुन्हा व्यवसाय हळूहळू सुरळीत होत आहेत. मात्र, अजूनही त्यातून काहीजण बाहेर पडले नाहीत. काहींनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला होता मात्र, सध्या अशांची परिस्थिती वाईटच आहे. यामुळे पोट भरायचे की, बँका व फायनान्स कंपन्यांचे हप्ते भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

असे असले तरी दोन वर्षे वसुली न केलेल्या बँका, आता संस्थांनी कर्जदारांकडे कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. लॉकडाऊन काळातही काही फायनान्स कंपन्यांनी तर रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत सक्तीची कर्जवसुली केली आहे.

फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज, वाहनकर्ज, पर्सनल लोन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकरिता अनेकांनी कर्ज घेतले आहे. अशांची वसुली सुरू झाली असून सध्याही फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची कर्जवसुली केली जात आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

March End Recovery
Kamgar Kalyan Scholarship : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 564 कामगार पाल्यांना मिळाली शिष्यवृत्ती

आर्थिक वर्ष संपत असल्याने ३१ मार्चपर्यंत कर्ज हप्ता न भरल्यास असे कर्ज थकीतमध्ये मोडते. परिणामी अशा थकीत कर्जदाराची बाजारपेठेतील पतही घसरते. वेळेत कर्ज फेडू न शकणाऱ्या व्यक्तीला पुन्हा कर्ज मिळवण्यातही अडचणी येतात. त्यामुळे कर्जदारांकडूनही हप्ता भरण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे. किमान व्याज तरी कमी होईल या अपेक्षेने प्रयत्न सुरू आहे.

सध्या लग्नसराई, यात्रा हंगाम यामुळे खर्च वाढल्याने कर्ज भरणे जिकिरीचे होत आहे. संस्थांचे प्रतिनिधी हप्ता भरण्यासाठी उशीर झालेल्या कर्जदारांच्या घरी जाऊन वसुली करता आहेत. वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू असल्याने काही कर्जदार तर नॉट रिचेबल झाल्याचे चित्र आहे. एकंदरीत बँका, पतसंस्थांच्या वसुली मोहिमेमुळे कर्जदारांची धावपळ सुरू झाली आहे.

खासगी सावकारीत अडकले

बँकांमध्ये आवश्यक कागदपत्रे व तारणाशिवाय कर्ज मिळत नाही. त्यामुळे खासगी सावकारीकडे अनेकजण वळू लागले आहेत. मार्चअखेर कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सावकारांकडून उचल घेतली जात आहे. सावकारांच्या जाळ्यात अलगद असे कर्जदार अडकत असून, यामुळे खासगी सावकारांचा व्यवसाय तेजीत दिसत आहे.

March End Recovery
Students Innovation : विद्यार्थ्यांनी बनवली ‘ब्लाईंड स्टिक’; दीड फुटांवरच कळणार अडथळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com