Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू

election
electionesakal

नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात होत आहे. बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत असून, त्यासाठी सोमवार (ता.२७)पासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार आहे.

३ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. अनेक इच्छुकांनी पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. (Battle of market committee election starts from today nashik news)

जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात २८ एप्रिलला जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नाशिक, घोटी, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव या बाजार समित्यांसाठी मतदान होईल. २९ एप्रिलला मतमोजणी होईल.

दुसऱ्या टप्यात लासलगाव आणि मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान अन् त्याच दिवशी मतमोजणी होईल. दोन टप्प्यांत मतदान होणार असले तरी सर्व बाजार समित्यांसाठी एकाचवेळी २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

२७ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी मुदत असून, ५ एप्रिलला अर्जांची छाननी होईल. छाननीनंतर ६ एप्रिलला उमेदवारी यादी जाहीर केली जाईल. २० एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. २१ एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हाचे वाटप होईल.

पॅनल निर्मितीसाठी बैठकांना जोर

बाजार समित्यांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात होत असताना दुसरीकडे पॅनल निर्मितीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पॅनलच्या नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याने पहिल्या दिवशी अर्ज दाखल करण्याची अनेकांनी तयारी केली आहे.

election
Nashik News : भूखंडांसाठीच्या अटी जाचक; आयमा पदाधिकाऱ्यांचे सोनाली मुळेंना साकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com