BD Bhalekar School
sakal
जुने नाशिक: बी. डी. भालेकर शाळा पाडण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध शाळा बचाव समितीतर्फे बुधवारी (ता.१२) परिसरात स्वाक्षरी मोहीम घेत नवव्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. दरम्यान आमदार देवयानी फरांदे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच याठिकाणी विश्रामगृह होणार नाही. शैक्षणिक कामासाठीच जागेचा वापर केला जाईल. असे आश्वासन दिले.