SAFE Seminar News | 'सेफ’ च्‍या माध्यमातून व्‍हा जबाबदार आई-बाबा! : डॉ. मालविका तांबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Malvika Tambe

SAFE Seminar News | 'सेफ’ च्‍या माध्यमातून व्‍हा जबाबदार आई-बाबा! : डॉ. मालविका तांबे

नाशिक : विविध कारणांनी सध्याच्‍या काळात कस (फर्टिलिटी) कमी होत असून, वंध्यत्‍वाबाबत फारशी चर्चा अद्यापही समाजात होत नाही.

होणाऱ्या बाळामध्ये आई-वडिलांची गुणसूत्रे हस्‍तांतरित होत असल्‍याने केवळ बाळाला जन्‍म देणे हे दांपत्‍यांचे कर्तव्‍य नसून, जन्‍माला येणारे बालक हे सर्वार्थाने सुदृढ असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. (Be a responsible parent through SAFE Dr. Malvika Tambe Nashikkar spontaneous response to the seminar at Kusumagraj Pratishthan Nashik News)

हेही वाचा: Nashik News : विनयनगरच्या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण हटविणार

गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्‍या विशाखा हॉलमध्ये आयोजित परिसंवादात त्‍या बोलत होत्‍या. ‘आई-बाबा व्‍हायचं आहे?’ असा परिसंवादाचा विषय होता.

डॉ. मालविका तांबे म्‍हणाल्‍या, की सेफ’ ही उपचार पद्धती सर्वांपर्यंत पोचावी असा श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचा आग्रह होता. या उपचार पद्धतीत प्रत्‍येक दांपत्‍याची वैद्यकीय स्‍थिती लक्षात घेऊन स्वतंत्ररीत्या उपचाराची दिशा ठरविली जाते. आई-बाबा होणे ही पुरुष व महिला अशी दोघांची प्रत्‍येकी पन्नास टक्‍के जबाबदारी आहे.

त्यामुळे संपूर्ण उपचार प्रक्रियेत दोघांचा समान सहभाग असणे आवश्‍यक असते. उपचार पद्धतीतील संतुलन पंचकर्म या प्रक्रियेसह उपचाराची संपूर्ण माहिती त्‍यांनी उपस्‍थितांना दिली. कारला (जि. पुणे) येथील केंद्रात शास्‍त्रशुद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जाते. या समस्‍येचा सामना करत असलेल्‍या जोडप्‍यांनी तपासणी करून घेताना उपचारप्रक्रियेतून सुदृढ बालकाला जन्‍म द्यावा, असे आवाहन त्‍यांनी केले. ज्‍या जोडप्‍यांची शारीरिक, सामाजिक, आर्थिक व बौद्धिक क्षमता आहे, त्‍यांनी बाळाला नक्‍की जन्‍म द्यायला हवा, असा सल्‍ला डॉ. मालविका तांबे यांनी दिला.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News : शहरातील 323 बेघर निवारा केंद्रात रवाना

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्‍या पन्नास वर्षांच्‍या प्रदीर्घ संशोधनावर आधारित हजारो वर्षांच्‍या भारतीय आयुर्वेदाने सिद्ध केलेली ‘संतुलन आयुर्वेद फर्टिलिटी एक्‍स्‍पिरिअन्‍स’ (SAFE) ही यशस्‍वी उपचार पद्धती आहे. ‘सेफ’च्‍या माध्यमातून जबाबदार आई-बाबा होण्याची संधी उपलब्‍ध आहे, असे प्रतिपादन डॉ. मालविका तांबे यांनी शनिवारी (ता. २१) येथे केले.

पुण्यातील कार्यक्रमाला मिळालेल्‍या प्रतिसादानंतर नाशिकला झालेल्‍या राज्‍यातील दुसऱ्या कार्यक्रमालाही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी उपस्‍थितांनी प्रश्‍नोत्तरांच्‍या माध्यमातून शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाच्‍या सुरवातीस ‘सकाळ’चे मुख्य व्‍यवस्‍थापक (जाहिरात) सुनील पाटील यांनी डॉ. मालविका तांबे यांचे स्‍वागत केले. तर सुनील तांबे यांचे स्‍वागत ‘सकाळ’चे वरिष्ठ व्‍यवस्‍थापक (एचआर) संजय पाटील यांनी केले. प्रशांत सागवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा: Jalgaon News : कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणाची तब्बल 7 लाख 60 हजारांत फसवणूक

वंध्यत्‍वाचे सामाजिक

दुष्परिणाम जाणवतील

वंध्यत्‍व ही अत्‍यंत गंभीर समस्‍या बनली असून, आत्ताच या समस्‍येच्‍या निराकरणास सुरवात केली नाही, तर पुढील तीस ते चाळीस वर्षांमध्ये त्‍याचे दुष्परिणाम जाणवतील. जापान हा वृद्धांचा देश म्‍हणवला जातो. तशीच परिस्थिती भारताची होऊ नये म्‍हणून वंध्यत्‍व निवारणाचे गांभीर्य ओळखले जावे, अशी अपेक्षा डॉ. मालविका तांबे यांनी व्‍यक्‍त केली.

कारला केंद्रात शास्‍त्रोक्‍त

उपचार : सुनील तांबे

स्‍वास्‍थ्‍यावर काम करण्यासाठी स्‍वयंपूर्ण ठिकाण असावे, या श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्‍या मनात आलेल्‍या विचारांतून १९७५ मध्ये केंद्राची उभारणी झाली. येथील वातावरणानेच रुग्‍ण अर्धा बरा होत असतो. आयुर्वेदासारख्या संपन्न आरोग्‍य शाखेतून शास्‍त्रोक्‍त उपचाराची संधी उपलब्‍ध आहे, अशी माहिती सुनील तांबे यांनी दिली. योग, प्राणायाम, स्‍वास्‍थ्य संगीत, ध्यान, धारणा, औषधी यांची योग्‍य सांगड घातली जात असल्‍याने येणारा निकाल अत्‍यंत प्रभावी असतो, असे त्‍यांनी नमूद केले.

नाशिक केंद्र संपर्क

संतुलन आयुर्वेद क्‍लिनिक,

चित्रबोध अपार्टमेंट, पी ॲन्ड टी कॉलनी, सेबल डिलक्‍स हॉटेलजवळ, नाशिक- ४२२००५.

मोबाईल क्रमांक- ९८८१२८२१५२

ई-मेल- nasikshop@santulan.in

संकेतस्‍थळ- santulan.in

हेही वाचा: Nashik News : पहिल्या टप्प्यात 57 ठिकाणी चार्जिंग स्टेशन; 35 ठिकाणी निधी उपलब्ध होणार