Nashik News : शहरातील 323 बेघर निवारा केंद्रात रवाना

Home Yojna News
Home Yojna Newsesakal

नाशिक : दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागाकडून शहरात विविध ठिकाणी बेघर शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात एकूण ३२ बेघरांना निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.

फुटपाथ, रेल्वेस्थानक, बसस्थानक, धार्मिक स्थळे परिसर आदी सार्वजनिक ठिकाणी रात्री उघड्यावर झोपणाऱ्या बेघर नागरिकांना मूलभूत सोई- सुविधायुक्त निवारा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Deen Dayal Antyodaya Yojana National Urban Livelihood Mission Department conducted a homeless search campaign at various places in city total of thirty two homeless people admitted to shelter Nashik News)

Home Yojna News
Nashik News : चोंढीला बिबट्या जाळ्यात; मात्र सुटकेच्या प्रयत्नात जखमी

त्यानुसार उड्डाणपूल, गंगाघाट, रामकुंड परिसरात १९ जानेवारीला रात्री ८ ते १२ या कालावधीत बेघर नागरिक शोध मोहीम राबविली. महापालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक, समूह संघटक, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, पोलिस प्रशासन तसेच बेघर निवारा केंद्राचे विनामूल्य देखभाल व व्यवस्थापन करणारी संस्था श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान, त्र्यंबकेश्वर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

रात्री उघड्यावर, फुटपाथवर झोपणाऱ्या बेघर नागरिकांना निवारा केंद्र बाबतची माहिती देण्यात आली. निवारा केंद्रात आसरा घेणे बाबत समुपदेशन करण्यात आले. त्यातील एकूण ३२ वृद्ध, रुग्ण, दिव्यांग बेघरांना महापालिकेच्या वाहनामार्फत निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. महापालिकेंतर्गत तपोवनातील स्वामी विवेकानंद बेघर निवारा केंद्र महापालिका व त्र्यंबकेश्वर येथील श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानच्या संयुक्त विद्यमाने चालविले जात आहे.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Home Yojna News
Nashik News: वीजनिर्मितीत MVP होणार स्‍वयंपूर्ण; Solar Park किंवा शाखानिहाय सौरऊर्जा प्रकल्‍पाची चाचपणी

बेघर नागरिकांना निवारा केंद्रात दाखल केल्यानंतर संस्थेमार्फत तत्काळ अंथरूण, पांघरूण, साहित्य, जेवणाची व्यवस्था केली. शहरात फुटपाथ, सिग्नल, पुलाखाली किंवा इतरत्र कोठे बेघर नागरिक आढळल्यास सामाजिक भावनेतून अशा नागरिकांना निवारा केंद्रात दाखल करावे किंवा त्याची माहिती महापालिकेच्या डे-एनयुएलएम विभागाला द्यावी, असे आवाहन उपायुक्त करुणा डहाळे यांनी केले.

Home Yojna News
Nashik News : निधी खर्चासाठी ZPत धावपळ; तालुकानिहाय पंचायत समित्यांमध्ये बैठकांचा सपाटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com