Nashik News : मारहाण, अपहरण अन् आत्महत्या; विरोधात संतप्त गावकऱ्यांचा एकत्रित लढा

Bharveer Budruk: Nivritti Khatale's daughter is being cremated by angry villagers on the porch of her abductor's bungalow
Bharveer Budruk: Nivritti Khatale's daughter is being cremated by angry villagers on the porch of her abductor's bungalowesakal

Nashik News : एखादे संकट असो किंवा झालेला अत्याचार एकजुटीने आपण मात करून अन्यायाविरुद्ध लढा देवून न्याय मिळवू शकतो. असेच भरवीर येथील एका मुलीच्या असह्य आई-वडिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण गाव एकवटले.

शेकडो पोलिस आणि सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितही अपहरणकर्त्याच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये मुलीच्या आत्महत्याग्रस्त आईवडिलांवर नातेवाईक व ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार केले.

एकतर्फी प्रेमातून मुलाने आईवडिलांच्या डोळ्यांदेखत मुलीचे अपहरण केल्याने खचलेल्या आईवडिलांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले असून घटनेचा निषेध करण्यात येत आहे. अपहरणकर्त्याला अटक होईपर्यंत संपूर्ण गाव दुखवटा पाळणार आहे. (Beating kidnapping and suicide united fight of angry villagers against Nashik News)

याबाबत अधिक माहिती अशी: रविवारी (ता.२९) दुपारी निवृत्ती खातळे हे पत्नी मंजुळा आणि मुलीसह गाडीवरून भरवीर गावाकडे जात होते. सिन्नर - घोटी शिर्डी महामार्गावरील वाजे पेट्रोल पंपासमोर समाधान सोमनाथ झनकर आणि त्याच्या साथीदारांनी खातळे यांची गाडी अडविली. खातळेंना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांनी मुलीला आई-वडिलांसमोरच आपल्या वाहनात बसवून अपहरण करीत घेऊन गेले.

एकतर्फी प्रेमातून आपल्या एकोणीस वर्षीय तरुण मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्याने निराश झालेल्या खातळे दांपत्याने भगूर येथील नूतन शाळेमागे गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या करीत जीवन संपविले.

या घटनेची नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. मुलीचे मामा दिगंबर शेळके यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांत झनकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bharveer Budruk: Nivritti Khatale's daughter is being cremated by angry villagers on the porch of her abductor's bungalow
MGNREGA News: ग्रामपंचायतींमध्ये आता अतिरिक्त ग्रामरोजगार सेवक! मनरेगाची कामे वेळात होण्यासाठी शासनाकडून आदेश

गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळी भरवीर बु. येथील गावकरी आणि नातेवाइकांनी खातळे दांपत्याचा मृतदेह ताब्यात घेऊन अपहरणकर्त्या सोमनाथ झनकर याच्या बंगल्यासमोरच्या पोर्चमध्ये आणला आणि निषेध म्हणून पार्थिवावर तेथेच अंत्यसंस्कार केले.या प्रकारामुळं इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अत्याचाराविरोधात ग्रामस्थांचा लढा

एकतर्फी प्रेमातून भरवीरच्या तरुणाने शेतकरी कुटुंबातील मुलीच्या आईवडिलांना शिवीगाळ करीत मारहाण केली आणि मुलीचे अपहरण केले. तणावाखाली असलेल्या मातापित्यांने रेल्वेखाली येत आत्महत्या केली.

ही बातमी कळताच संपूर्ण ग्रामस्थ संतप्त झाले. आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अपहरणकर्त्याच्या घरासमोरच मुलीच्या मृत आईवडिलांवर अंत्यसंस्कार केले. जोपर्यंत गुन्हेगारास अटक करून कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत संपूर्ण गाव दुखवटा पाळणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

Bharveer Budruk: Nivritti Khatale's daughter is being cremated by angry villagers on the porch of her abductor's bungalow
Nashik Accident News : कसारा घाटात बटाट्याचा ट्रक उलटला; दोघांना बाहेर काढण्यात यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com