Nashik News : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवरून लाखोंच्या बाकांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Benches worth lakhs stolen from Indiranagar jogging track nashik crime news

Nashik News : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवरून लाखोंच्या बाकांची चोरी

इंदिरानगर (जि. नाशिक) : जॉगिंग ट्रॅक दरम्यान बसविलेल्या लाखो रुपयांच्या लाकडी बाकांची सर्रास चोरी (Theft) होत असल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. (Benches worth lakhs stolen from Indiranagar jogging track nashik crime news)

मागील दोन दिवसात या ठिकाणी असलेले नऊ ते दहा बाक चोरट्यांनी चोरून नेले आहेत. विशेष म्हणजे कामात न येणाऱ्या या बाकांच्या लाकडी फळ्या तेथेच टाकायच्या आणि केवळ जमिनीमध्ये गाडलेली लोखंडी सांगाडा घेऊन जायचा ही चोरीची पद्धत ठेवण्यात आली आहे.

नियमितपणे येथे जॉगिंगसाठी येणाऱ्या महेंद्र बार्हे, निखिल सरपोतदार, अशोक चव्हाण, काळू बागूल, विलास भदाणे, संदीप अहिरे, सीताराम जाधव, आशिष दाभोळकर आदींच्या लक्षात ही बाब आली.

त्यांनी माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांना कळविल्यानंतर तेदेखील येथे आले. दोन दिवसात नऊ ते दहा बाक चोरीला गेल्याचे लक्षात आले. ॲड. बडोदे यांनी बांधकाम आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळवली आणि या चोरीबाबत रीतसर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

मनसेतर्फे आंदोलनाचा इशारा

अधिकारी आणि ठेकेदाराचे दुर्लक्ष आणि सुरक्षारक्षक नसल्याने चोरी होत आहेत. बिनदिक्कत येणाऱ्या टवाळखोर, प्रेमीयुगलांमुळे येथे व्यायामासाठी येणारे नागरिक विशेषतः महिला वर्ग अत्यंत त्रस्त आहे. पोलिस यंत्रणेचा कुठलाही धाक टवाळखोर, गर्दुल्ले व भुरट्या चोरावर उरला नसून सदर घटनेची तत्काळ चौकशी करून गुन्हेगारांवर कडक कारवाई कर करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.

अन्यथा याविरोधात मनसे स्टाइल आंदोलन उभारण्यास येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील असा इशारा वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे महिला शहराध्यक्ष अर्चना जाधव, मध्य नाशिक विभाग अध्यक्ष धिरज भोसले, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष ॲड. निकितेश धाकराव, पराग शिंत्रे, निखिल सरपोतदार, पद्मिनी वारे, नीलेश लाळे, सचिन सोनार आदींनी दिला आहे.

टॅग्स :Nashikcrimethief