नाशिक- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यात सर्वाधिक उद्दिष्ट मिळालेल्या नाशिक जिल्ह्यात एक लाख ४४ हजार ३७५ घरकुलांचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक १३ हजार ४७० घरकुलांचा समावेश आहे.