Crime
sakal
नाशिक: शरणपूर येथील बेथेलनगरमध्ये हवेत गोळीबार करून दहशत माजविल्याप्रकरणी एका संशयिताला धोंडेगावच्या जंगलातून जेरबंद करण्यात आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या अंबड गुन्हे शोध पथकाने शिताफीने सापळा रचून शनिवारी (ता. ८) दुपारी अटक केली आहे. सोमवारी (ता. ३) रात्री सराईत गुन्हेगार राहुल पवारच्या टोळीने गोळीबार केला होता.