नाशिक: पोलिसांना आव्हान देणाऱ्या सराईत गुन्हेगारांना दिवाळीपूर्वीच ‘फराळपाणी’ दिल्यानंतरही सोमवारी (ता. ३) रात्री शरणपूर परिसरातील बेथेलवाडी येथे गुन्हेगारांची राडा घालत रिक्षांची तोडफोड करीत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली..गुन्हेगारी टोळ्यांच्या आपसातील वादातून हा प्रकार घडला असून, या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. तर राडा घालणाऱ्या टोळीचा सूत्रधार पसार झाला असून, अटक करण्यात आलेल्या संशयितांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिसांचा ‘कायद्याचा बालेकिल्ला’ सैल झाला की काय, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे..गेल्या महिन्यात शहर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात आक्रमक भूमिका घेत ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ हा ‘कर्णिक पॅटर्न’ राबविला. राज्यभर गाजावाजा झालेल्या या पॅटर्नमुळे शहरातील टवाळखोरांसह सराईत गुन्हेगारांनी चांगलीच धास्ती घेतली. ऐन दिवाळीत शहरातील व्हॉइट कॉलर लोंढे, बागूल टोळीला गजाआड करीत दिवाळीचा फराळपाणी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले..असे असताना, आठवड्यापासून पोलिसांचा पॅटर्न थंडावल्याचे पाहून तिबेटियन मार्केट परिसरातील बेथेलवाडीत राहुल पाटील व त्याच्या साथीदारांनी सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने सोमवारी रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास राडा घातला. संशयित १५-२० जणांच्या टोळक्याने मद्याच्या बाटल्या रस्त्यावर फेकत लाकडी दांडके, चॉपर, कोयत्याचा वापर करीत रिक्षांची तोडफोड केली. तसेच, संशयितांपैकी एकाने हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण केली होती..या प्रकरणी बेथेलवाडीतील रिक्षाचालक मायकल भंडारी यांच्या फिर्यादीनुसार भूषण पवार, रोशन शिंदे, ओम जगताप, प्रेम जगताप, अजय देवरे, विक्की गुंजाळ या संशयितांसह १५ ते २० जणांविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी भंडारी यांना ठार करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने येत्या १० तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे..पोलिसांची सतर्कताबेथेलवाडीत गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह शहर गुन्हे शाखा युनिट एक व सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पोहोचण्यापूर्वीच संशयित पसार झाले होते. तरीही नियंत्रण कक्षाकडून नाकाबंदी करीत असलेल्या पथकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्याच वेळी गंगापूर रोडने जेहान सर्कलच्या दिशेने धावत असलेल्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी रोखून ताब्यात घेतले..पाटणकरवर हल्ल्याचा कटसराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर पाच ते सहा महिन्यांपासून फरारी आहे. खुनासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पाटणकरचा पोलिसही शोध घेत आहेत. त्याच्यावर यापूर्वीच तडीपारीसह एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झालेली आहे..गेल्या वर्षी कारागृहातून सुटून आल्यानंतर बेथेलवाडीतून त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी पोलिसांनी पाटणकरला अटकही केली होती. सोमवारी रात्री संशयित टोळक्याने पाटणकरवर हल्ला करण्याचा कट रचल्याचे समोर येते आहे; परंतु तो न सापडल्याने संशयितांनी राडा घालत हवेत गोळीबार केला..Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.. .अधिकाऱ्यांचे मौन का?गुन्हेगारी टोळीने हवेत गोळीबार केल्याने पोलिसांना आव्हान दिले. या घटनेबाबत मात्र पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह सरकारवाडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगत कानावर हात ठेवल्याचा प्रकार संशय व्यक्त करणारा आहे. आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जात असताना मात्र पोलिस ठाण्याचे अधिकारी मात्र या घटनेबाबत कोणतीही माहिती देत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होते आहे. गेल्याच आठवड्यात सातपूरच्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यातही केंद्रीय माजी राज्यमंत्र्यांच्या नातवाविरोधातील गुन्ह्याबाबतही असा प्रकार घडला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.