सावधान! अशा व्हॉट्सअँपपासून रहा लांब; जास्त फीचरच्या मोहात याल गोत्यात

mobile.jpg
mobile.jpg

नाशिक : जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग ॲप असलेल्या व्हॉटसअप वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने कंम्प्युटरऐवजी आता मोबाइलवरून  ॲटक होत आहेत. त्यासाठी वेगवेगळी शक्कल सायबर भामटे लढवत आहेत. मागे व्हॉट्सअँप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले होते. मात्र आता तर सायबर भामट्यांनी व्हॉट्सअँपचं एक बनावट व्हर्जन तयार केले आहे. ओमर नावाच्या अरेबिययन अँप डेव्हलपरने सिक्युरिटीला भेदून. हुबेहूब व्हॉट्सॲपप्रमाणेच दिसणाऱ्या बनावट अँपची निर्मिती केलेली आहे. वाचा काय सांगता अभ्यासक आणखी...

फोनमधील सर्व माहिती चोरली जाऊ शकते...

स्मार्टफोनमध्ये कुठलेही ॲप्लिकेशन अथवा गेम्स डाऊनलोड आणि इन्स्टॉल करतांना काळजी घ्या. हे करतांना कारण बहुतेकवेळा आपण ॲपची 'टर्म्स अँड कंडीशन' सविस्तर न वाचता 'ॲक्सेप्ट' हा पर्याय निवडतो. जेव्हा तुम्ही 'ॲक्सेप्ट' हा पर्याय निवडता तेव्हा स्मार्टफोनमधील फाईल्स, फोन नंबर्सची यादी, सर्व माहिती, फोटो, तुमचं लोकेशन अशा अनेक महत्वाच्या गोष्टी त्या ॲपला वापरण्याची परवानगी तुम्ही देत असता. अशा रीतीने नकळत तुम्ही तुमच्या फोनचा कंट्रोल त्या ॲपच्या कंपनीच्या हातात देत असता. आणि ही डाऊनलोड केलेली ॲप तुमच्या फोनमधील सर्व माहिती त्यांच्या कंपनीला पोहचवितात.

सायबर सेलला तपासात आढळले...

'ॲप्लिकेशन कंपन्या 'युजर एक्सपिरिअन्स'ची माहिती मिळवण्याच्या नावाखाली तुमच्या घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. परंतु मोबाइलमधल्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग कंपनी स्वतःच्या वापरासाठी करू शकत नाही.
स्मार्टफोनमधील अनेक ॲप्स संर्टफोनवरील घडामोडींवर लक्ष ठेवून फोनमधली काँटॅक्ट लिस्ट, व्हिडिओ, फोटो आणि इतर महत्वाची माहिती महत्त्वाची कागदपत्रं चोरून त्यांच्या कंपनीला पोहचवितात. अनेक प्रकरणात काही कपंनीचे ॲप्स महिलांच्या मोबाईलमधील त्यांचे फोटो चोरून फोटोशॉपच्या सहाय्यानं तिच्या फोटोमध्ये फेरफार करून अश्लील वेबसाइटवर अपलोड केल्याचं सायबर सेलला तपासात आढळून आलेलं आहे.

गीबी व्हाट्सअप चे धोके आणि फायदे -

- महत्वाचे म्हणजे हे एक अन ऑफिसिएल अँप आहे. ओरिजिनल व्हाट्सॲप पेक्षा जास्तीचे फिंचर असल्याचा दावा.
- ऑटो रिस्पॉन्स
- मेसेज पाठविताना स्टेटस ऑनलाइन लिहलेले असते ते लपविता येते.
- मेसेज टाइप करतांना समोरच्या युसर्सला टायपिंग स्टेटस असे कळते ते लपविता येते.
- मेसेज न येणार न जाणार सेटिंग उपलब्ध
- थीम आणि आयकॉनचे कलर बदलता येते
इंन्स्टॉल का नाही करायचे/ ताबडतोब डिलीट करा
-मॅन इन द मिडल अटॅक होण्याची शक्यता
- पॉलिसी न वाचता बऱ्याचशा परमिशन युसर्स देतात
- मेसेज एडीट होण्याची शक्यता
- अनऑफिसिअल व्हर्जन
 - प्ले स्टोर  वर उपलब्ध नाही आणि ना कि ऑफिसिअल वेबसाईट आहे.
- ओमर अरेबिययान डेव्हलपर : जास्त फीचरचे अमिष दाखवून प्रचार
- थर्ड पार्टी व्हर्जन अप .
- व्हॉट्सअँपची एपीआय हॅक करून देता. चोरी, रेकॉर्डिंग, खाजगी माहितीची चोरी
- मेसेज लीक होण्याची शक्यता
- ओरिजिनल व्हाट्सअँप तुम्हाला कायम बॅन करेल
- पासवर्ड गेम्स करण्याची शक्यता
- ऑनलाइन बँकिंगचा पासवर्ड चोरी जाण्याची शक्यता
- महत्वाचे कागदपत्र हॅक होण्याची शक्यता   

काय आहे या बनावट ॲपचा धोका

व्हॉट्सॲपच्या पॉलिसीनुसार तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि एकूण गोपनीय माहिती तुमच्या व्यतिरिक्त कुणीही पाहू शकत नाही. मात्र या बनावट ॲपच्या माध्यमातून तुमच्या फाईल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो.
- हे बनावट ॲप डाऊनलोड केल्यास फोनमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे.
- मेसेज एडिट करून एखाद्या यूजरची बदनामीही केली जाऊ शकते.
- Gb whatsapp Fake App आहे आणि जर तुम्ही Gb whatsapp वापर केले तर  तो whatsappची WABetaInfo  त्याची जबाबदारी घेत नाही.

जीबी व्हाट्सॲप हे ओथोराइज्ड व्हाट्सॲपचे एप्लीकेशन नाहीये. या ॲप्लिकेशनमध्ये व्हाट्सॲपचा डेटा सिंक्रोनस होत असल्यामुळे तुमची खाजगी इन्फॉर्मेशनवरती सुद्धा सोबतच डल्ला मारला जाऊ शकतो. - तन्मय दिक्षित, सायबर तज्ञ

अशी बनावट ॲप सर्वप्रथम आपल्या खाजगी जीवनाला टार्गेट करतात. हे करतांना ब्लॅकमेल करून आर्थिक फायदा करून घेतात. सदर ॲप वापरण्याचे प्रमाण तरुण-तरुणींमध्ये मोठया प्रमाणात असून हा प्रकार अनेक अर्थाने अंगलट येऊ शकतो. यामुळे अशी बनावट ॲप वापरून आपण आपलं खाजगी आयुष्य धोक्यात घालू नये. - प्रा.योगेश अशोक हांडगे, सहायक प्राध्यापक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com