Nashik: डायल 112 वर फेक कॉल करत असाल तर खबरदार! चुकीची माहिती देत पोलिसांची फसवणूक; गुन्हा दाखल

call
callesakal

देवळा : आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी पोलिसांकडून डायल ११२ ही सेवा दिली जाते. या क्रमांकावर कॉल केल्यास तत्काळ मदत उपलब्ध होते.

नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून पोलिसांना चुकीची माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात एका इसमाविरुद्ध गुरुवारी (ता.१२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beware of fake calls on Dial 112 Deceiving the police by giving false information Filed case Nashik crime)

तिसगाव (ता. देवळा) येथील राजेंद्र जाधव या इसमाने डायल ११२ या क्रमांकाने फोन करून परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस नाईक सागर पाटील हे तत्काळ श्री. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार गांजा विक्री होत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्याकरिता रवाना झाले.

त्याठिकाणी पोचल्यावर त्यांनी तक्रारदार श्री. जाधव यांची भेट घेत अधिक माहिती घेतली असता श्री. जाधव यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

call
Nashik Crime News : व्यवस्थापकाने लावला मद्य कंपनीला 10 कोटींना चुना; आर्थिक व्यवहारात फेरफार करीत केली फसवणूक

पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करताच खोटी माहिती दिल्याचे श्री. जाधव यांनी कबूल केले. खोटी माहिती देत पोलिसांना नाहक त्रास दिल्याप्रकरणी संशयित राजेंद्र जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनतेने या टोल फ्री क्रमांकाचा योग्य आणि खऱ्या कारणासाठी उपयोग करावा असे आवाहन देवळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी यावेळी केले.

call
Crime News: धक्कादायक! घरातील गुप्तधन शोधण्यासाठी १२ वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com