
Fraud Scheme : आर्थिक गुंतवणुकीच्या योजना सुरू करताना कोणत्याही शासकीय संस्थेची परवानगी न घेता जादा परताव्या आमिष दाखविले जाते.
अशा योजनांपासून (ponzi scheme) गुंतवणुकदारांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे विभागाने केले आहे. (Beware of financial investment ponzi scheme State Economic Crime Branch appeals to investors nashik crime)
आर्थिक स्वरुपाच्या गुंतवणूकीसंदर्भात योजना राबवायची असेल तर त्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी), भारतीय रिझर्व्ह बँकेचे एनबीएफसीचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
परंतु या स्वरुपाचे कोणत्याही मान्यता वा प्रमाणपत्र न घेता काही गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक गुंतवणुकीच्या योजना राज्यासह देशभरात सुरू आहेत.
यातून गुंतवणूकदारांची फसवणूक होत असते. अशा अनेक घटना घडल्या असून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हेही दाखल आहेत.
डिव्हाईन पॉवर फायनान्शियल प्रा.लि. या कंपनीने सेबीच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे. त्याचप्रमाणे, लिक्युईलोन्स, फेअरसेंट, लेंडेनक्लब, लेन्डबॉकस, जीराफ, ग्रीपीन्व्हेस्ट या कंपन्यांनी कोणत्याही प्रकारच्या लायसन्सशिवाय कर्ज देण्याचे आर्थिक व्यवहार केले आहे.
तर काही कंपन्यांनी कॅश-इ, ए-ए-क्रेडिट, क्व्ीकमनी, क्रेडिटबस, कॅशगेन अशी अनधिकृत ॲप्सच्या माध्यमातून पार्ट टाईम जॉब, इन्हेस्टमेंन्ट, न्युजपेपर ॲडस्, एज्युकेशनल कोर्सेसचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते.
त्याचप्रमाणे काही कंपन्यांच्या नावे खोट्या इ-कॉर्मर्स वेबसाईटस्, ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते.
त्याचप्रमाणे मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनी अमेरिकेत स्थित असल्याचे भासवून क्रेप्टो मिनिंग कंपनीच्या माध्यमातून टेलेग्राम व व्हॉटसॲपच्या माध्यमातून फसवणूक केली जाते. यासंदर्भातील तक्रारी आरबीआय, सेबी, एनएसइ यांच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत.
अशा स्वरुपाच्या कोणत्याही कंपन्यांच्या आमिषाला बळी न पडता गुंतवणूकदार वा नागरिकांनी खात्री करूनच आर्थिक गुंतवणकू करावी. जादा परताव्याच्या आमिषालाही गुंतवणूक बळी पडू नये असे आवाहन आर्थिक गुन्हेशाखेतर्फे करण्यात आले आहे.
नाशिकमध्येही आहेत गुन्हे
मैत्रेय रिअलटर्स, मिरजकर सराफ, आडगावकर सराफ, श्री माऊली मल्टिस्टेट क्रेडिट को.ऑप. सोसायटी, संकल्पसिद्धी प्रॉडक्स इंडिया प्रा.लि., आर.आर.वर्ल्ड फायनान्सियल सर्व्हिसेस, कलकाम रिअल इन्फ्रा, आदिशक्ती सोल्युशन फोरच्युन प्रा.लि., ऑर्बिट क्रिप्टो कॉईन या कंपन्यांमार्फत गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत नाशिक शहर आर्थिक गुन्हेशाखेमार्फत तपास सुरू आहे.
"परवानाधारक नसताना आर्थिक गुंतवणूकीची योजना सुरू असेल, फसवणूक झालेली असेल तर संबंधितांनी तात्काळ नाशिक शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे संपर्क साधून तक्रारी करावी. अशा भुलथापांना नागरिकांनी बळी न पडता सावधगिरी बाळगावी."
- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर आर्थिक गुन्हेशाखा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.